शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
3
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
5
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
6
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
7
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
8
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
9
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
10
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
12
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
13
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
14
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
15
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
16
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
17
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
18
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
19
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
20
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 

ऊसदराची बैठक निष्फळ; साताऱ्यातील कारखानदार म्हणतात ३१००, संघटना ३५०० वर ठाम

By नितीन काळेल | Published: November 30, 2023 3:38 PM

जिल्हाधिकाऱ्यांकडून ठाम भूमिका : गनिमी कावा अन् साखर अडविणार; शेतकरी संघटना एकत्र

सातारा : सातारा जिल्ह्यातील ऊसदराबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेतल्याने कारखानदारांच्या प्रतिनिधींनी ३१०० रुपये दर जाहीर केला. पण, शेतकरी संघटनांनी पहिला हप्ता ३५०० रुपयेच देण्याचीच आक्रमक भूमिका ठेवली. यामुळे तोडगा निघालाच नाही. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आता कारखानदारांना लवकर निर्णय घेण्याची सूचना केली असून संघटनांनी मात्र, एकत्र येत दोन दिवसानंतर गनिमी काव्याने आंदोलन आणि साखर अडविण्याचा इशारा दिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराचा तिडा संपला आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार काय भाव देणार याकडे लक्ष लागलेले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर कारखानदार प्रतिनिधी आणि शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, बळीराजा शेतकरी संघटनांचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी रघुनाथदादा पाटील, पंजाबराव पाटील, राजू शेळके, विकास जाधव, मधुकर जाधव, देवानंद पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकीत साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींकडून दर जाहीर होत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी डुडी यांनी जागेवरच दर जाहीर कारखान्यासाठी प्रतिनिधींना सूचना केली. यावर सर्वांनी एक होत यावर्षी उसाला प्रति टन पहिला हप्ता ३१०० रुपये दर देण्याचे जाहीर केले. पण, यावर शेतकरी संघटनांचे समाधान झाले नाही. त्यांनी बळीराजा अडचणीत आहे. साखरेला दर चांगला मिळत आहे. त्यामुळे उसाला पहिला हप्ता ३५०० रुपये मिळालाच पाहिजे, अशी ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली.तसेच गेल्यावर्षी तोडणी झालेल्या उसालाही टनामागे पैसे देण्याची मागणी करण्यात आली. पण, यावर चर्चा होऊन काहीच निर्णय झाला नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कारखानदारांना काही सूचनाही केली. सायंकाळपर्यंतच दराचा निर्णय घेण्याबाबत स्पष्ट केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची बैठक निष्फळ ठरली.दरम्यान, बैठकीनंतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. उसाला पहिला हप्ता ३५०० रुपये मिळालेच पाहिजे, मागील तोडलेल्या उसाला पैसे मिळावेत यासाठी कारखानदारांना दोन दिवसांची मुदत देत आहे. या दोन दिवसांत दराबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास गनिमी काव्याने आंदोलन करु. ऊस वाहतूक वाहने रोखण्याबरोबरच रास्ता रोको करु असा इशाराही दिला.

रघुनाथदादा म्हणाले पाच हजार दर..या बैठकीला रघुनाथदादा पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी उसाला पहिला हप्ता पाच हजार रुपये द्या, नाहीतर दोन कारखान्यामधील अंतराची अट रद्द करा अशी मागणी केली. तसेच याबाबत निर्णय न झाल्यास कारखान्यातील साखर अडविण्याचा इशाराही दिला.

जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहे. तर दुसरीकडे साखरेला चांगला दर मिळत आहे. पण, साखर कारखानदार शेतकऱ्यांना चांगला दर देण्यास तयार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार समाधानकारक दर देऊ शकतात. मग, जिल्ह्यातील कारखानदारांना काय होते. आता दोन दिवसांत दराबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी गनिमी काव्याने निर्णायक आणि अंतिम लढा देऊ. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेcollectorजिल्हाधिकारी