शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

साताऱ्यात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन घेतले शेतीचे धडे

By प्रगती पाटील | Updated: July 3, 2024 11:26 IST

सातारा : कृषिप्रधान देशात मुलांना विद्यार्थी दशेतच शेतीच्या शिक्षणाचे धडे मिळणे, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणे व या कष्टातून ...

सातारा : कृषिप्रधान देशात मुलांना विद्यार्थी दशेतच शेतीच्या शिक्षणाचे धडे मिळणे, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणे व या कष्टातून पिकलेले अन्न वाया न घालविण्याची सवय लागणे यांची जाणीव मुलांना या वयातच होणे ही काळाची गरज ओळखून प्रतिवर्षी प्रमाणे या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच मुलांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेती व शेती संबंधित सर्व उत्पादन प्रक्रियांची माहिती विद्यालयाचे वतीने देण्यात आली.राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात गेले अनेक वर्षे प्रत्यक्ष कृतीतून प्रयोगशील शिक्षण या संस्थेच्या उपक्रमाद्वारे इयत्ता पाचवीतील मुलांना फुलशेती, सहावीतील मुलांना आयुर्वेदिक वनस्पती लागवड, सातवीतील मुलांकडून गटशेती करुन घेतली जाते तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना रब्बी व खरीप हंगाम म्हणजे नेमके काय? या हंगामात घ्यावयाची पिके, पेरणीपूर्व मशागत, पेरणी, पेरणीपश्चात मशागत, देशी - विदेशी वाणांची बियाणे, ग्रामीण जीवन पध्दती, पशुधन यांविषयी माहिती दिली जाते.यावेळी स्वतः शेतकरी असलेले शिक्षक एम. आर. जाधव, एन. ए. कांबळे व पी. एस. निंबाळकर यांनी लगतच्या परिसरातील शेतावरती नेऊन विद्यार्थ्यांशी पेरणीच्या अनुषंगाने सुसंवाद साधला. याप्रसंगी मुलांनी आडवी पेरणी, उभी पेरणी, मुख्य पीक, आंतरपीक, कोळपणी, खुरपणी ते मळणी व बियाणांच्या विविध जाती विषयी विचारलेल्या प्रश्नांना शिक्षकांनी समर्पक उत्तरे दिली.स्थानिक जनतेचे राहणीमान, पशुधनाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय, रासायनिक व जैविक/नैसर्गिक खते यांविषयीची माहितीही जाणून घेतली. प्रत्यक्ष कृतीतून प्रयोगशील शिक्षण या संस्थेच्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सर्वांगीण दृष्ट्या सक्षम रितीने घडविण्यासाठी जे प्रयत्न विद्यालयाच्या माध्यमातून केले जात आहेत. त्याचा मुलांच्या भावी आयुष्यात नक्कीच उपयोग होईल असा विश्वास शाखाप्रमुख एस. एस. क्षिरसागर यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थीAgriculture Sectorशेती क्षेत्र