सातारा : ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी दहिवडी पोलिसांचे पथक गुरुवारी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पुणे येथील घरी गेले होते. परंतु, देशमुख त्यांना चौकशीसाठी उपलब्ध झाले नसल्याने पथक परत आले.मंत्री गोरे यांच्या बदनामीचे प्रकरण गेल्या महिन्यात राज्यभर गाजत होते. दरम्यान, मंत्री गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणामध्ये अनेकजण असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची चाैकशी करणे आवश्यक असल्याचे तपासी अधिकाऱ्यांना वाटले. त्यानुसार तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह सात ते आठ पोलिसांचे पथक गुरुवारी देशमुख यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेले होते. परंतु, या पथकाला देशमुख उपलब्ध झाले नाहीत. पोलिस पथकाने देशमुख यांचे कुटुंबीय, त्यांचे स्वीय सहायक व चालकांशी पोलिसांनी चर्चा केली. त्यानंतर पोलिस पथक परत आले.
मंत्री गोरे खंडणी प्रकरण: प्रभाकर देशमुख यांच्या चौकशीसाठी गेलेले पथक माघारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:21 IST