सणबूर : ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील दुभाजकांंत उंचच उंच झाडे झाले होते. यामुळे प्रदूषण कमी होत होते. मात्र अज्ञातांनी झाडे तोडली आहेत. तसेच फुलझाडे व अँटी ग्लेअरची विनाकारण तोडफोड करून त्याठिकाणी गोवऱ्या थापल्या आहेत. कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेल्या या रस्त्याचे विद्रुपीकरण होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.कऱ्हाड शहराशी जोडून आर्थिक, सामाजिक, औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या ढेबेवाडी-कऱ्हाड रस्त्याचे तीन वर्षांपूर्वी चौपदरीकरण केले आहे. रात्रंदिवस या मार्गावर वर्दळ असते. या मार्गाचे मानेगावपर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. तेथून पुढे काही ठिकाणी चौपदरीकरण तर काही ठिकाणी रुंदीकरण केले आहे. चौपदरीकरण झालेल्या रस्त्यामध्ये दुभाजक बसवण्यात आले असून त्यामध्ये सुशोभीकरणासाठी फुलझाडे आणि रात्री वाहनांच्या प्रखर दिव्यांचा चालकांना त्रास होऊन अपघात घडू नयेत यासाठी अँटी ग्लेअर लावले आहेत. मात्र त्यांची मोडतोड करून रस्त्याचे विद्रुपीकरण सुरू आहे.
रस्ता दुभाजकातील झाडे तोडली; थापल्या गोवऱ्या
By दीपक शिंदे | Published: February 06, 2024 6:26 PM