निलेश साळुंखे
कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफानी पावसाची बॅटीग सुरू असुन पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवार दि 23 जुलै ला रात्री अकरा वाजता धरणाच्या पाणीसाठ्याने पन्नास टीएमसीचा टप्पा पार केला आहे.सोमवारी सकाळी आठ वाजता धरणातील पाणीसाठा 51.93 टीएमसी इतका झाला आहे. कोयना परिसर व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 15 जुलै पासुन पावसाची संततधार सुरू झाली असुन ती अद्याप कायम आहे. जुन महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घटच होत गेली जुलैच्या महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत गेली.
दि 17 जुलै ते 24 जुलै या आठवड्यात मुसळधार पावसाने धरणातील आवक व पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे.दि 17 जुलै रोजी धरणातील पाणीसाठा 25.89 टीएमसी इतका होता गत आठ दिवसात तब्बल 26 टीएमसीने यात वाढ झालेनं पाणीसाठाने अर्धशतक पार केले आहे.याच आठ दिवसात दि 20 जुलै ला पाण्याची आवक ही 74569 क्युसेक्सने सुरू होती चालुवर्षीतील ही सर्वात जास्त आहे.तर आठ दिवसात धरणाच्या पाणीपातळी 41 फुटाने वाढली आहे.तर दि 19 जुलैला सकाळी चोवीस तासात नवजा येथे तब्बल 307 मिलीमीटर पावसाची नोंद जुनपासुनची सर्वात जास्त आहे.तर याच आठवड्यात कोयना 993 नवजा 1213 व महाबळेश्वर येथे 1275 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षाच्या सुरुवातीला एक धरणात 17.64 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता जुन जुलैमधे पडलेल्या पावसाने सुमारे 42 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. कोयना धरण परिसरात पावसाने हाहाकार केला असुन नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.