शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
3
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
4
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
5
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
6
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
7
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
8
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
9
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
10
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
11
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
12
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
13
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
14
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
15
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
16
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
17
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
18
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
19
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
20
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

बेदम मारहाण करुन तरूणाला ढकललं उकळत्या चुन्यात, तरूण गंभीर जखमी; साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:41 PM

नेमक्या कोणत्या कारणातून वाद झाला याचे कारण अद्याप पुढे आलं नाही

सातारा : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणाला त्याच्या मित्रांनीच बेदम मारहाण करून त्याला उकळत्या चुन्यात ढकलल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील रविवार पेठेत आज, गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यामध्ये संबंधित तरूण भाजून गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी. साताऱ्यातील रविवार पेठेमध्ये चुनाभट्टी असून, या ठिकाणी समाधान मोरे (वय २३) हा राहात आहे. समाधान स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. गुरुवारी सकाळी त्याची त्याच्या मित्रांसोबत शाब्दिक वादावादी झाली. यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. हा वाद रस्त्यावरच सुरू होता. 

मारहाण करत त्याच्या मित्रांनी समाधानला शेजारीच असलेल्या उकळत्या  चुन्यात  ढकललं.  त्यानंतर  संबंधित  मित्र  तेथून पसार झाले. उकळत्या चुन्यात समाधानचे शरीर डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण चुन्याने भरले. चुन्यात भाजला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. 

या प्रकारानंतर  काही नागरिकांनी समाधान मोरेला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. समाधानचा त्याच्या मित्रांसोबत नेमक्या कोणत्या कारणातून वाद झाला, हे अद्याप पुढे आले असून, पोलीस समाधानचा जबाब नोंदवत आहेत. त्यानंतरच या मारहाणीचे कारण स्पष्ट होणार आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी