सातारा : साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या प्राचार्याच्या बंगल्याच्या आवारातून चंदनाची दोन झाडे तोडून खोडाची चोरी करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी आनंद अनंतराव कमलापूर (वय ५२, रा. सैनिक स्कूल स्टाफ क्वार्टर्स, सदर बझार सातारा) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार बुधवारी मध्यरात्रीच्या २ ते पहाटे सहाच्या दरम्यान अज्ञाताने ही चोरी केली. चोरट्याने सैनिक स्कूलच्या प्राचार्यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या दोन झाडावर डल्ला मारला. अज्ञाताने प्रथम कशाच्या तर सहाय्याने झाडे खाली पाडली. त्यानंतर चंदनाच्या झाडांची खोडे पळविली. या खोडांची किंमत २० हजार रुपये इतकी होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार इष्टे हे तपास करीत आहेत.
.......................................................