शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

...तर ढाबामालकांना अटक शक्य

By admin | Published: July 24, 2015 10:15 PM

पोलिसांचा इशारा : तालुका हद्दीतील आठ हॉटेलांवर कारवाई

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे रात्री दहानंतर सुरू राहणाऱ्या, तसेच इतर तांत्रिक बाबींची पूर्तता नसणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ढाब्यांवर ठिकठिकाणी कारवाई सुरू आहे. मात्र, तरीही यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित ढाबामालकावर गुन्हा दाखल होऊन त्यास अटक होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री दहानंतर सुरू राहणाऱ्या ढाब्यांवर बुधवारी रात्री कारवाई करण्यात आली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतही गेल्या दोन दिवसांत आठ ढाबे-हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सोनगावजवळील हॉटेल शिवार, खिंडवाडीजवळील राजस्थानी ढाबा, वाढेजवळील हॉटेल हिंदवी स्वराज्य, हॉटेल स्वाद, निसर्ग ढाबा, रहिमतपूर रस्त्यावरील ओमकार हॉटेल, तसेच हॉटेल जायका आणि हॉटेल समर्थ कृपा या हॉटेल-ढाब्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू झाले आहे. या कलमान्वये त्या-त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. सध्या ज्या ढाब्यांवर कारवाई झाली आहे, ती मुंबई पोलीस कायद्यानुसार झालेली दंडात्मक कारवाई आहे. परंतु यानंतर नियमभंग झाल्यास भारतीय दंडविधानाच्या कलम १८८ नुसार संबंधिताला अटकही होऊ शकते, असे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मद्यपान? अजामीनपात्र गुन्हा!अनेक ढाबे-हॉटेलांना दारूविक्रीचा परवाना नसतो; मात्र अनेकजण तेथे बसून मद्यसेवन करीत असल्याचे आढळून येते. काही ठिकाणी छुपेपणाने मद्य पुरविले जाते, तर काही ठिकाणी संबंधित शौकिन बाहेरून मद्य घेऊन येतात आणि ढाब्यावर सेवन करतात. पोलिसांच्या कारवाईत असे आढळून आल्यास संबंधित ढाबामालकावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले.