महाबळेश्वर : कोरोना सध्या नियंत्रणात आहे. परंतु गर्दीमुळे पुन्हा जर प्रादुर्भाव वाढला तर महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांना पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागले, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला.महाबळेश्वर येथे महाबळेश्वर शहर विकास आराखडा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, पर्यवेक्षाधीन अधिकारी मनीषा आव्हाळे, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील उपस्थित होते़महाबळेश्वरचा विकास आराखड्यावर काम सुरू झाले आहे, तेव्हा काही सूचना असतील तर सांगण्याची विनंती जिल्हाधिकारी सिंह यांनी बैठकीत केली. यावर ह्यवेण्णालेक येथे सायंकाळनंतर शुकशुकाट पसरतो. याठिकाणी लेझर शो सुरू करण्यात आला. तर येथील व्यावसायिकांना रात्री नऊपर्यंत व्यवसाय मिळेल. वेण्णालेक येथील पूल बांधून बायपास सुरू करावा. टोल नाक्याच्या जागेवरून पालिका व वन विभाग यांच्यात वाद सुरू आहे. याप्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही कुमार शिंदे यांनी केली.नगरसेवक युसूफ शेख यांनी पाचगणी, दांडेघर टोल नाक्यावर महाबळेश्वरचा टोलही जबरदस्तीने वसूल केला जातो. याकडे लक्ष वेधले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी महाबळेश्वरचे पॉईंट पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी केली. तसेच याचा पाठपुरावाही सुरू ठेवला.येथील घोडे व्यावसायिक, टॅक्सी संघटना, व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनीही मागणी केली होती. आता दिवाळी हंगाम सुरू होत आहे. या बाबी लक्षात घेऊन दोन दिवसांत पॉईंट सुरू करण्यास परवाणगी देणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ह्यमहाबळेश्वर येथे पर्यटन वाढीपेक्षा पर्यटकांना सोयी सुविधा मिळतात. त्याच्या दर्जामध्ये वाढ करण्याची गरज आहे. महाबळेश्वर येथे आल्यानंतर पर्यटकांचा बराच वेळ टोलनाक्यावर जातो. वाहतूक कोंडी होते म्हणून पर्यटकांना ऑनलाईन टोल भरण्याची सुविधा पालिकेने सुरू करावी.
वेण्णालेक येथे पालिकेबरोबरच वन विभागाचाही टोल वसूल करतात. एकाच ठिकाणी दोन विभागांची टोल वसुली कशी होते. पॉईंटवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे संरक्षक कठडे असले पाहिजे. स्वच्छतागृह, प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था, वाहनतळ जागा पॉईंटचे फलक, माहिती फलक असावे, खासगी बससाठी वाहनतळ मिळावे, आदी मागण्या नगरसेवकांनी केल्या. चर्चेत नगरसेवक किसनराव शिंदे, प्रकाश पाटील, विमल पार्टे यांनी सहभाग घेतला.