सातारा : देशातील आमदार-खासदारांचा दोन वर्षांचा निधी कोरोनासाठी वर्ग केल्याचे सांगितले जाते, मात्र दुसऱ्या बाजूला बेड, वेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने जनता तडफडत आहे. या परिस्थितीत जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.विजयादशमी दिनानिमित्त जलमंदिर पॅलेस येथे रविवारी भवानी तलवारीचे पूजन केल्यानंतर उदयनराजे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उदयनराजेंनी यावेळी चौफेर टीका केली.उदयनराजे म्हणाले, लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या राज्यकर्त्यांना पदावर राहण्याची लायकी नाही. कोरोना काळात देशातील आमदार-खासदारांचा निधी वर्ग केल्याचे सांगितले जात होते, मग आता हा निधी नेमका गेला कुठे? कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाले नाहीत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. निधीची तरतूद केलेली असताना ही परिस्थिती का ओढवली ? याचा जाब जनता विचारत आहे.उदयनराजेंनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, काहीजण केवळ डोक्यात पैशांचा विचार ठेवतात. मी मात्र फक्त भावनेचा विचार करतो. आताची जी वेळ लोकांवर आली आहे, त्या वेळेमध्ये लोकांना सावरण्याची गरज असताना त्यातून पैसा मिळवावा, ही चुकीची भावना काही लोकांच्या मनात आहे.उदयनराजेंनी प्रशासनावरही टिकास्त्र सोडले. कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण असताना महसूल यंत्रणा हा प्रकार हाताळत आहे. विशेष म्हणजे डॉक्टर तज्ज्ञ असल्यामुळे त्यांच्यावर सगळी जबाबदारी द्यायला हवी. डॉक्टर, फिजिशियन यांच्या वेतनात शासनाने वाढ करावी.आई तुळजाभवानी... राज्यकर्त्यांना बुद्धी देविजयादशमी दिनाच्या निमित्ताने सर्वत्र आई भवानीला साकडे घातले जात आहे. तिची पूजा केली जाते आहे. सध्याच्या काळात आई भवानीने राज्यकर्त्यांना चांगली बुद्धी द्यावी, असे साकडे देखील उदयनराजेंनी यावेळी घातले.
...तर जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 4:17 PM
Udayanraje Bhosale, dasara, satara news: देशातील आमदार-खासदारांचा दोन वर्षांचा निधी कोरोनासाठी वर्ग केल्याचे सांगितले जाते, मात्र दुसऱ्या बाजूला बेड, वेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने जनता तडफडत आहे. या परिस्थितीत जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
ठळक मुद्दे...तर जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : उदयनराजे केंद्र आणि राज्य सरकारांवर दसऱ्यादिवशी सोडले टीकास्त्र