शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Satara: अर्धांगवायूचा झटका, बांबूचं डालगं अन् सात किलोमीटरची पायपीट!, मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळचं विदारक चित्र

By सचिन काकडे | Updated: August 4, 2023 13:15 IST

घोणसपूरमधील ‘त्या’ महिलेवर महाडमध्ये उपचार

सचिन काकडेसातारा : एका वृद्ध महिलेला अर्धांगवायूचा झटका येतो... गावात दवाखाना नसल्याने तिला बांबूच्या डालग्यात बसवलं जातं... दगड- धोंडे, घसरड्या वाटा अन् पावसाचा मारा झेलत त्या महिलेला एक दोन नव्हे, तर सात किलोमीटरचा प्रवास करून दवाखान्यात नेलं जातं... ही कुठल्या चित्रपटाची कथा नसून, महाबळेश्वर तालुक्यातील घोणसपूर गावात घडलेली खरीखुरी घटना आहे. मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचे गावही याच परिसरात आहे. वर्षानुवर्षे या भागातील ही स्थिती बदललेलीच नाही.घोणसपूर हे गाव अतिदुर्गम भागात वसले असून, या गावात जाण्यासाठी ना रस्ता आहे, ना आरोग्य केंद्र. गावातील एखादी व्यक्ती, महिला आजारी पडल्यास रुग्णासह गावकऱ्यांना तब्बल दीड तास पायपीट करून दूधगाव गाठावे लागते. इथून पुढे मिळेल त्या वाहनाने महाबळेश्वर अथवा पोलादपूर, महाड येथील रुग्णालयात हलवावे लागते. गुरुवारी सकाळी गावात राहणाऱ्या कुसुम संभाजी जंगम (६५) या वृद्धेला अर्धांगवायूचा झटका आला. वृद्धेला तातडीने उपचार मिळणे गरजेचे होते. कुटुंबीय व गावकऱ्यांनी वेळ न दवडता कुसुम जंगम यांना बांबूच्या डालग्यात बसवलं. पाऊस लागू नये म्हणून त्यांच्या अंगावर प्लास्टिक कागद झाकला अन् गावकऱ्यांचा दवाखान्याच्या दिशेनं प्रवास सुरू झाला.पावसामुळं जंगलातील पायवाटा घसरड्या झाल्या होत्या. डालगं खांद्यावर घेऊन ग्रामस्थ या वाटा व दगड- धोंड्यांतून कशीबशी वाट काढत पुढं येत होते. दीड तासात सुमारे सात किलोमीटर पायी प्रवास केल्यानंतर ग्रामस्थांनी दूधगाव गाठलं. इथं आल्यानंतर त्यांनी एका वाहनातून कुसुम जंगम यांना महाबळेश्वरला उपचारासाठी नेलं. इथं प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना महाड येथील रुग्णालयात हलविण्यात आलं. आता त्यांची प्रकृती समाधानकारक आहे, असं नातेवाइकांनी सांगितलं.

भारत चंद्रावर; पण आमचं गाव पारतंत्र्यातभारत एकीकडं लाखो किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर यान उतरवू पाहत आहे; परंतु इथं जमिनीवर राहणाऱ्या, हजारो संकटं अंगावर झेलणाऱ्या हाडा- मांसाच्या माणसांना साध्या भौतिक सुविधा मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. घोणसपूर ग्रामस्थ आजही पारतंत्र्यात असल्यासारखे जीवन जगत आहेत. ग्रामस्थांनी सलग १५ वर्षे श्रमदान करून कच्चा रस्ता तयार केला. मात्र, पाऊस- पाण्यापुढे तो तग धरत नाही. मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळच ही विदारक परिस्थिती असून, आम्ही जगायचं तरी कसं? अशा व्यथा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

आमची माणसं घोरपडीसारखी चिवट आहेत, म्हणून ती टिकून आहेत; पण दुर्गम भागात राहणाऱ्या या लोकांनी सहन तरी किती करायचं. प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी आम्ही २००२ पासून करत आहोत; परंतु आमच्या मागणीची दखल गांभीर्यानं घेतली जात नाही. -डॉ. कुलदीप यादव, दूधगाव, ता. महाबळेश्वर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीHealthआरोग्य