शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

धरणात नाही पाणी! पावसाअभावी खोळंबली पेरणी; कोयनेत २८ टीएमसी साठा कमी

By नितीन काळेल | Published: July 16, 2023 6:57 PM

सातारा जिल्ह्यात यंदा पश्चिम भागातच पावसाने हजेरी लावल्याने आणि पूर्वेकडे कायम प्रतीक्षा असल्याने खरीप हंगामातील पेरणीवर मोठा परिणाम झालेला आहे.

सातारा : जिल्ह्यात यंदा पश्चिम भागातच पावसाने हजेरी लावल्याने आणि पूर्वेकडे कायम प्रतीक्षा असल्याने खरीप हंगामातील पेरणीवर मोठा परिणाम झालेला आहे. आतापर्यंत फक्त ३५ टक्केच पेरणी झाली आहे. तर मागीलवर्षी जुलैअखेरपर्यंत ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. तसेच ३ लाख हेक्टरवर पीक होते. त्याचबरोबर यंदा धरणातही पाणीसाठा अपुरा आहे. कोयना धरणात तर गतवर्षीपेक्षा २८ टीएमसी साठा कमी आहे.

जिल्ह्यात उन्हाळी पाऊस पडल्यानंतर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सूनचा पाऊस पडतो. यंदा मात्र, वळवाच्या पावसाने हुलकावणी दिली. तसेच मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला. पाऊस सुरू होऊन आता तीन आठवडे होत आलेतरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. पश्चिम भागातच पाऊस पडल्याने भात लागण आणि पेरणी काही प्रमाणात झाली. मात्र, पूर्व भाग दुष्काळी असून या तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आतापर्यंतचा विचार करता एकूण क्षेत्राच्या जवळपास एक लाख हेक्टरवरच पेरणी आहे. १२ जुलैच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार भाताची लागण १२ हजार ४०० हेक्टरवर झालेली आहे. याचे प्रमाण २८ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ५ हजार हेक्टरवर तर मकेची ४ हजार २०० हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ४४ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण ६० आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी १०० टक्के क्षेत्रावर होऊ शकते असा अंदाज आहे. तर भुईमुगाची १५ हजार हेक्टर म्हणजे ५० टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.

बाजरीची ७ हजार हेक्टरवरच पेर...खरीप हंगामात जिल्ह्यात बाजरी हेच प्रमुख पीक होते. पण, आता सोयाबीनचे क्षेत्र वाढत चालले आहे. यावर्षी बाजरीची ६० हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज होता. पण, आतापर्यंत ७ हजार हेक्टरवर पेर झाली. याचे प्रमाण फक़्त ११ टक्के आहे. त्यातच बाजरी प्रामुख्याने माण तालुक्यात ३१ हजार ५०० हेक्टरवर घेण्याचा अंदाज होता. पण, अद्यापही दमदार पाऊस नसल्याने शेतकरी यापुढे बाजरी पेरणीचे धाडस करणार नाहीत.

पाटणमध्येच ६१ टक्के पेरणी...पाटण तालुक्यातच ६१ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. या तालुक्यात २८ हजार हेक्टरवर भात लागण आणि पेर आहे. तर सातारा तालुक्यात १३ हजार ४२० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. पेरणीचे प्रमाण ४२ टक्के आहे. कऱ्हाड तालुक्याचे क्षेत्र ३८ हजार ५७७ हेक्टर असून ४३ टक्के पेर आहे. कोरेगाव तालुक्यात ७ हजार ८२६ हेक्टरवर पेरणी असून टक्केवारी ३७ च्या वर आहे. खटाव तालुक्यात जवळपास ४६ हजार हेक्टर क्षेत्र असून १२ टक्केच पेरणी झाली. माण तालुक्यात ३९ हजार ६०६ हेक्टरपैकी साडे नऊ हजार हेक्टरवर बाजरीसह इतर पिकांची पेरणी झाली आहे. फलटण तालुक्यात ३ हजार ३१० हेक्टरवर, खंडाळ्यात १७ टक्के, वाई तालुक्यात २१ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. धरणांत कमी पाणीसाठाजिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस होत असलातरी अजूनही म्हणावा असा जोर नाही. त्यामुळे बहुतांशी धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोयना धरणात सध्या २५ टीएमसी पाणीसाठा आहे. पण, गतवर्षी तो ५३ टीएमसी होता. म्हणजे कोयनेतच गतवर्षीपेक्षा २८ टीएमसी साठा कमी आहे. तसेच धोम, कण्हेर, येरळवाडी आणि उरमोडी धरणातही कमी पाणीसाठा आहे. 

टॅग्स :satara-acसाताराKoyana Damकोयना धरण