प्रमोद सुकरे : कऱ्हाड महाराष्ट्रात विधानसभेची गणगौळण सगळीकडेच सुरू झाली आहे. कऱ्हाड दक्षिणही त्याला अपवाद नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दक्षिणेवर स्वारी करणार का, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे; पण मंगळवारच्या कऱ्हाड दौऱ्यात याची तसूभरही चर्चा झाली नाही. किंबहुना हा विषय कटाक्षाने टाळण्यात आला. त्यामुळे बाबांच्या मनात काय गुपित लपलंय, याचा थांगपत्ता दस्तुरखुद्द कार्यकर्त्यांनाच लागेनासा झालाय.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रिंगणात उतरावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे; पण विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यासह कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दोन वर्षांपासूनच जोर बैठका सुरू ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे सारेच काँग्रेसचे. बहुमत आहे; पण एकमत नाही, अशी या मतदार संघाची अवस्था होऊन बसली आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण, यावर दस्तुरखुद्द काँग्रेस जनातच संभ्रम आहे. तो संभ्रम पृथ्वीराज चव्हाण आजच्या दौऱ्यात तरी दूर करतील, अशी साऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, त्याचा भ्रमनिरासच झाला.
मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीची चर्चाच नाही
By admin | Published: July 10, 2014 12:27 AM