मलकापूर : ‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या रुग्णांना निकषाप्रमाणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार झाले पाहिजेत. त्यामध्ये नातेवाईकांचा हस्तक्षेप नको. सध्या सर्वत्र लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे काही प्रमाणात लसीचा तुटवडा भासत आहे. तर वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा परिणाम आहे,’ असा आरोप पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
‘ब्रेक द चेन’ हा शासनाने पंधरा दिवसाचा अंशतः लॉकडाऊन केला आहे. त्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी मलकापुरात आले असता ते बोलत होते. यावेळी पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह पालिका पदाधिकारी व आजी-माजी नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘ऑक्सिजनमुळे वाईट प्रसंग उद्भवणार नाही, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यावर मात करण्यासाठी इंडस्ट्रीचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून केवळ रुग्णांसाठी ऑक्सिजन वापर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जनजागृती व शहरात येणाऱ्यांसाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. लवकरच गरजेनुसार लस वा रेमडेसिविर उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ही जागतिक पातळीवरील नैसर्गिक आपत्ती आहे. या आपत्तीत सर्वांनी एकत्र येऊन सामोरे गेले पाहिजे त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
चौकट
मलकापुरातील ६ ठिकाणच्या नाकाबंदीची पाहणी
१) मलकापूर फाटा
२) मलकापूर नवीन भाजीमंडई
३) भारती विद्यापीठ लसीकरण केंद्र
४) मलकापूर जुनी मंडई
५) शिवछावा चौक नाकाबंदी
६) आगाशिवनगर परिसर
(चौकट)
शंभरवर दुचाकी जप्त
मलकापूर फाटा नाकाबंदीस अचानक भेट देऊन कऱ्हाड शहर पोलिसांनी योग्य कारणाशिवाय फिरणाऱ्या चालकांकडून शंभर दुचाकी ताब्यात घेतल्या. त्या वाहनांचीही पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
फोटो कॅप्शन
२४मलकापूर
शिवछवा
चौकात अधिकाऱ्यांकडून माहिती घेत शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच महामारीचे हे संकट रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. ( छाया : माणिक डोंगरे)