कऱ्हाड : ‘शिवसेना-भाजपची युती मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तुटली आहे. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढून घेण्याचा अन् भाजपने राष्ट्रवादी काँगे्रसचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे सगळे मित्रपक्ष आमच्याबरोबरच आहेत,’ असा विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या पाठिंब्याच्या प्रश्नाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बगल दिली.रावसाहेब दानवे रविवारी कऱ्हाड दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, आदींची उपस्थिती होती.रावसाहेब दानवे म्हणाले, ‘मुंबईत पारदर्शक कारभार या मुद्द्यावरून भाजप-सेनेत दुरावा निर्माण झाला आहे. यापूर्वीही असा दुरावा निर्माण झाला होता. पुन्हा एकत्र आलो. त्यांचा आणि आमचा असे स्वतंत्र दोन पक्ष आहेत. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विकासाचा मुद्दा घेऊन प्रचार करणार आहोत. चव्हाणांनी दक्षिणेत काय विकास केला?दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी कार्वे (ता. कऱ्हाड) येथे रविवारी दुपारी भाजपची प्रचार प्रारंभ सभा पार पडली. कऱ्हाड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडून आल्यापासून काय विकास केला? या भागातील अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. येथील लोकांना भेटण्यासाठीही साधा यांच्याकडे वेळ नाही. सत्ता असूनही या भागाचा विकास करता आला नाही’, अशी टीका दानवे यांनी केली
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच नाही
By admin | Published: January 29, 2017 10:42 PM