शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रेमाचा 'रंग' होतोय 'बेरंग'; जीव ओवाळून टाकणारेच घेताय एकमेंकाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 2:25 PM

प्रेयसीने दगा दिला, तर संतप्त प्रियकर टोकाचे पाऊल उचलतो.

सातारा : एका टप्प्यावर जीव ओवाळून टाकणारे प्रेम दुसऱ्या टप्प्यावर एकमेकांना उद्ध्वस्त करण्याचा अतिरेक करत आहे. गेल्या काही वर्षांपासून घडलेल्या घटनांमधून समाजमन अस्वस्थ झाले आहे. त्याच्यामुळे हे प्रेम की आणखी काही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

आधी ओळख नंतर मैत्री तासन् तास चॅटिंग आणि त्यानंतर जिना मरना संग संगच्या आणाभाका घेणारे प्रेमवीर. पहिल्या टप्प्यात एक दुसऱ्यासाठी काहीही करायला तयार होतात. विरोध करणाऱ्या रक्ताच्या नातेवाइकांना शत्रू समजतात. या स्थितीत त्यांचा मुक्त वावर सुरू असतो. धमाल-मस्ती, फिरणे खाणे अन् गाण्यासोबतच बेभान होऊन ते सर्व मर्यादा ओलांडतात. पती-पत्नी सारखे एकमेकावर हक्क दाखवतात. विशिष्ट कालावधीनंतर मात्र त्यांच्यातील प्रेम ओसरू लागते. तिला दुसरा चांगला किंवा त्याला दुसरी चांगली मिळाली की पहिल्या साथीदाराला टाळणे सुरू होते.दुसऱ्याशी भेटीगाठी वाढल्याचा संशय आल्याने ती किंवा तो पेटून उठतो. नंतर सुरू होतो लग्नासाठी तगादा आणि आता तगाद्यातच दडली असते तिच्या किंवा त्याच्याबद्दलची सूडभावना. कथित प्रेमाचा उद्रेक होतो. दगाबाजी करणाऱ्या प्रियकाराविरुद्ध ती पोलिसांकडे धाव घेते. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावते. त्याच्या दगाबाजीची शिक्षा ती त्याला कौटुंबिक सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या रूपाने देते. त्याची बाजूही अशीच भयावह आहे.

प्रेयसीने दगा दिला, तर संतप्त प्रियकर टोकाचे पाऊल उचलतो. जालीम जमान्यापासून तिला सुरक्षित ठेवण्यासाठी आटापिटा करणारा प्रियकर या वळणावर चक्क तिला संपवून टाकण्याचा प्रयत्न करतो. सातारा जिल्ह्यामध्ये दगाबाजीनंतर कथित प्रेम प्रकरणाने घेतलेले जीव ते वळण समाजमन अस्वस्थ करणारे ठरले आहे.

प्रियसीने प्रियकराला विरुद्ध बलात्काराचा आरोप लावून त्याला उद्ध्वस्त करण्याचे महिनाभरात तीन तर हत्येच्या दोन घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणातील कथित पीडित आणि आरोपींमध्ये महाविद्यालयीन युवक तर कोणी नोकरदार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीतून पुढे आलेले हे वास्तव आहे.

जिल्ह्यातील या दोन घटना आहेत उदाहरण

पाटण तालुक्यातील चाफळ येथे काही महिन्यांपूर्वी भरदिवसा सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेमातून प्रियकराने भरदिवसा गळा चिरून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अनिकेत मोरे (वय २२, रा. शिंरबे, ता. कोरेगाव) याला अटक केली होती. दरम्यान अशाच प्रकारे कराड येथील विवाहितेची तिच्या मेव्हण्याने प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे समोर आले होते.

बदनामीचे षडयंत्र...

प्रेमसंबंधातून प्रारंभी लग्नाचा वादा करणाऱ्या प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तिचे दुसरे लग्न ठरले. मात्र, हतबल झालेल्या प्रियकर आणि तिची सोशल मीडियावर बदनामी केली. त्यामुळे ठरलेले लग्न तिचे मोडले. शिवाय तिच्या प्रियकराला ही कारागृहाची हवा खावी लागली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी