शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

आली लहर.. केला कहर अन् घेतले जहर--संताप आणि किरकोळ कारणातून आयुष्य संपवण्याचा मार्ग-- तरूणाईची मानसिकता =आत्महत्येची कारणमीमांसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:16 PM

सातारा : घरातून मिळालेल्या नकारातून आलेला राग, स्पर्धेच्या युगात सर्वांबरोबर धावताना होणारी दमछाक किंवा मग प्रेमातील अपयश यापैकी कोणतेही एक कारण तरुणाईला आत्महत्येच्या मार्गावर नेऊ पाहत आहे.

ठळक मुद्दे गळफास घेणेविषप्राशन करणे

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : घरातून मिळालेल्या नकारातून आलेला राग, स्पर्धेच्या युगात सर्वांबरोबर धावताना होणारी दमछाक किंवा मग प्रेमातील अपयश यापैकी कोणतेही एक कारण तरुणाईला आत्महत्येच्या मार्गावर नेऊ पाहत आहे. ‘आली लहर.. केला कहर अन् घेतले जहर,’ अगदी अशीच मानसिकता तरुणाईची दिसत आहे.हातात आलेल्या आधुनिक गॅझेटस्मुळे तरुणाईने दुनिया मुठ्ठीमे केली; पण वास्तविक ही दुनिया त्यांच्या मुठीतून दूर गेल्यानंतर येणाऱ्या नैराश्यातून त्यांनी ‘कायमची सुटका हवी’ म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणे पसंत करत आहेत. स्पर्धेच्या युगात स्वत:शीच लढत राहणाºया या विद्यार्थ्यांचा संवाद कमी झाला आहे. आॅनलाईन विश्वात रमणाºयांना विविध माध्यमातून ‘लाईक’ करणारे अनेकजण आहेत. मात्र, चेहºयावरील हावभाव आणि वर्तन बदलूनही कोणी काय झालं? हे विचारात नाही, याचे शल्य तरुणाईला बोचणारे आहे. कॉलेजमध्ये असलेला एकटेपणा, अभ्यास पेलता येत नसल्याने आलेले नैराश्य हे आत्महत्येची काही प्रमुख कारणे मानली जात आहेत.तरुणाईची सहनशीलता आता कमालीची ढासळली आहे. त्यामुळे कुठल्याही कारणाने झालेला विरोध पचवणं त्यांना जड जात आहे. अशात कुटुंबीयांना धडा शिकविण्यासाठी रागाच्या भरात विषप्राशन करणारे बहाद्दरही अनेक आहेत.महाविद्यालयाची चाहूल लागल्यानंतरच प्रत्येकाला आपली ‘परफेक्ट जोडी’ शोधण्याची उत्सुकता असते. मित्र परिवाराच्या मदतीने पाळत ठेवून एखादी आवडली आणि तिने नकार दिला तर युवक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. दुसरीकडे महाविद्यालयीन ओळखीचे नको इतक्या जवळचे संबंध प्रस्थापित केलेल्या युवतींना नंतर हे नाते पुढे नेता आले नाही तरीही त्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.आत्महत्यापूर्वी मिळतो सोशल संकेततारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आलेले नैराश्य सोसवतही नाही अन् सांगवतही नाही, असे असते. म्हणूनच कोणीतरी आपल्याला विचारावे, या हेतूने आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाई काही सोशल संकेत देते. व्हॉटस्अ‍ॅप अन् फेसबुकच्या दुनियेत वावरणारी तरुणाई स्टेटस आणि डीपी अपडेट करून काही सुचविते. हे सुचविणे जर मित्रांच्या लक्षात आले तर त्यातून आत्महत्या करण्याचा विचार बाहेर जातो; पण दुर्दैवाने मित्रांनीही जर हे गांभीर्याने घेतले नाही तर मात्र या जगाला माझी गरज नाही, म्हणून ही मुलं आत्महत्या करतात. घरी वावरतानाही ही मुलं कमालीची समंजस्य असल्यासारखे वागतात.ही काही कारणेप्रेम प्रकरणातील अपयशप्रेम संबंधातून निर्माण होणारी बदनामीची भीतीवाईट संगतीमुळे अभ्यासाकडे झालेले दुर्लक्षमहाविद्यालयात मिळणारी द्वेषकारक किंवा कमीपणाची वागणूकमहाविद्यालयातील वरिष्ठ वर्गातील मुलांकडून होणारे रॅगिंगसाताºयातील काही उदाहरणे१. जावळी तालुक्यातील एका तरुणीने घरात रविवारी तिच्या आवडीचे जेवण केले नाही, या कारणाने पडवीत जाऊन औषध पिऊन आत्महत्या केली. याविषयी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती.. सातारा तालुक्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाºया एका युवकाने परीक्षेच्या निकालाच्या भीतीने आत्महत्या केली. निकाल लागला तेव्हा हा मुलगा कमी गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे निदर्शनास आले होते.