शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

हे वाहनचालक देतात 'आरटीओ'ला हजारो, लाखो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:27 AM

राज्यभर सध्या आर्थिक मंदिचे सावट आहे. नवीन वाहने खरेदीचे प्रमाणही अलीकडच्या काळात कमी झालं आहे. मात्र, असे असले तरी साताºयात जरा वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हौसेसाठी कोणी काय करेल, याचा नेम नाही. नवीन वाहन घेताना गाडीच्या निम्म्या किमतीएवढी रक्कम मोजून अनेकजण

ठळक मुद्दे: सातारकरांच्या हौसेपुढे दोन कोटींही फिके; करावं ते नवलच

दत्ता यादव।सातारा : हौसेला मोल नसते, असं म्हटलं जातं हे खरं आहे. सध्या आर्थिक मंदीची सर्वत्र झळ बसत असतानाच सातारकरांनी मात्र गाड्यांच्या आकर्षक नंबरच्या केवळ हौसेसाठीआठ महिन्यांत २ कोटी १४ लाख रुपये मोजले आहेत. यावरूनच आर्थिक मंदीची झळ हौस करणाऱ्यांना बसतेय की नाही, हे दिसून येतेय.

राज्यभर सध्या आर्थिक मंदिचे सावट आहे. नवीन वाहने खरेदीचे प्रमाणही अलीकडच्या काळात कमी झालं आहे. मात्र, असे असले तरी साताºयात जरा वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हौसेसाठी कोणी काय करेल, याचा नेम नाही. नवीन वाहन घेताना गाडीच्या निम्म्या किमतीएवढी रक्कम मोजून अनेकजण आवडीचा आकर्षक नंबर घेत आहेत. आपल्या वाहनाला आकर्षक नंबर असावा, या पाठीमागे काहींची भावनाही असते. तर काहींची लग्नाची तारीख, बर्थडेट, शुभ नंबर, लकी नंबर समजून सातारकर गाडीचे नंबर खरेदी करत आहेत.

आपल्या आवडीचा नंबर खरेदी करताना तिप्पट फी भरून काहीजण नंबर घेत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाहायला मिळत आहे. आठ महिन्यांत २ कोटी १४ लाख ४२ हजार रुपये केवळ हौसेसाठी सातारकरांनी मोजले आहेत. यावरूनच सातारकरांच्या हौसेला किती मोल आहे, हे दिसून येते.अशा प्रकारचे आवडीचे नंबर घेताना सातारकरांकडून मागे-पुढे पाहिले जात नाही. एकाच नंबरवर जास्त लोकांनी दावा केला तर लिलाव पद्धतीने तो नंबर संबंधिताला दिला जात आहे.जो जास्त पैसे देईल, त्याला तो आकर्षक नंबर दिला जात आहे. आर्थिक मंदीची झळ हौसेसाठीमात्र बसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या हौसेसाठी लोक वाटेल ते करायला तयार आहेत. गाडीच्या आकर्षक नंबरवरून आपली प्रतिष्ठाही समाजात होईल, याकडेही अनेकांचा कटाक्ष असतो.

बुलेट दीड लाखाची.. नंबरसाठी ५० हजारएका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी नवीन दीड लाखाची बुलेट खरेदी केली. त्या बुलेटला आकर्षक नंबर घेताना संबंधित व्यक्तीने तब्बल ५० हजार रुपये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भरले. गाडीच्या किमतीच्या निम्मी रक्कमही अनेकजण आकर्षक नंबरसाठी देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

त्याने घेतला मुलाच्या जन्मतारखेचा नंबरबऱ्याच वर्षांनंतर मुलाचा घरात जन्म झाल्यानंतर एका व्यक्तीने नवीन कार खरेदी केली. मात्र, त्या कारचा नंबर मुलाचा जन्म झाल्याची तारीख असावी, असा त्याचा आग्रह होता. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आल्यानंतर त्याने एक लाख रुपये भरून आपल्याला हवा असलेला नंबर घेतला. या पाठीमागे लोकांची भावनिकता दिसून येते.

शासकीय गाड्यांनाही मोजावे लागतायत पैसेशासकीय गाड्यांचे आकर्षक नंबर पूर्वी मोफत मिळत होते. १००, ९९९९ हे आकर्षक नंबर पूर्वी फार प्रसिद्ध होते. मात्र, आता शासकीय गाड्यांनाही सरसकट सर्वांनाच आकर्षक नंबरसाठी पैसे मोजावे लागत आहेत. हा नियम १५ मे २०१३ पासून सुरू झाला आहे.

 

गाड्यांचे आकर्षक नंबर घेण्यासाठी सातारकरांमधून चांगला प्रतिसाद आहे. आठ महिन्यांत मिळालेला महसूल चांगला आहे. परंतु अजून साडेतीन महिने बाकी आहेत. नक्कीच तीन कोटींपर्यंत हा आकडा जाईल.- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

मंदीतहीचांदी...

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसSatara areaसातारा परिसर