शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

कोरेगाव येथे चक्क गुलाबी मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:32 PM

कोरेगाव : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत महिलांना प्रतिनिधित्व देत गुलाबी मतदान केंद्रांची निर्मिती करून अभिनव उपक्रम राबवला. सहायक निवडणूक ...

कोरेगाव : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत महिलांना प्रतिनिधित्व देत गुलाबी मतदान केंद्रांची निर्मिती करून अभिनव उपक्रम राबवला.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत कीर्ती नलावडे व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रोहिणी शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरेगाव शहरातील कांतिलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयात मतदान केंद्र क्र. २३० मध्ये हे केंद्र होते. तेथील सर्वच प्रक्रिया महिलांनीच पार पाडल्या. या केंद्रावर ८७९ एकूण मतदान होते.या मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्साहात तयारी केली होती. सर्वत्र गुलाबी पडदे लावून गुलाबी रंगाच्या फुग्यांची सजावट करण्यात आली होती. प्रवेशद्वार देखील आकर्षक बनविण्यात आले होते. तसेच भव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती. केंद्राध्यक्ष म्हणून सुजाता शेंडे यांनी काम पाहिले तर मतदान अधिकारी म्हणून राधा पाटील, अनुराधा भोसले, प्रिया बोबडे यांनी तर शिपाई म्हणून रोहिणी काळे यांनी कर्तव्य बजावले.पोलीस बंदोबस्तासाठी देखील महिला कर्मचारीच तैनात करण्यात आल्या होत्या. संपूर्ण शहरात या केंद्राचीच चर्चा होती. शहरातील नागरिक विशेषत: महिलांनी हे केंद्र पाहण्यासाठी गर्दी केली होती. तयार करण्यात आलेल्या पिंक केंद्र ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.