सातारा : पुढे चोरटे सुटले आहेत असे सांगून चोरट्यानेच वृध्देचे दागिने लांबविले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी अनुसया भास्कर शिंदे (रा. सदर बझार, सातारा) या वृध्देने तक्रार दिलेली आहे. तर दि. २३ आॅक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार कूपर काॅलनीतील रस्त्यावर घडला. तक्रादार या कोंडवे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. रामकुंड येथे बसस्टाॅपजवळ थांबल्यावर अनोळखी दोघेजण आले. त्यांनी पुढे चोर सुटले आहेत, असे सांगून वृध्देला दागिने कागदाच्या पुडीत ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे वृध्देने दागिने दिले. त्यानंतर दागिने घेऊन चोरट्यांनी खडा ठेवून पुडी वृध्देच्या हातात दिली. फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. या घटनेत माळ आणि कर्णफुले चोरट्यांनी लांबविली. याची किंमत सुमारे ४५ हजार रुपये होती. सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक जगताप हे तपास करीत आहेत.
Satara: चोरट्यानेच पुढे चोरटे असल्याचे सांगून फसविले, वृध्देचे दागिने लांबविले
By नितीन काळेल | Published: October 25, 2023 3:16 PM