राजू पिसाळ
पुसेसावळी: खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी गॅस कटरचा वापर देखील करण्यात आला. मात्र चोरट्यांना मशिन फोडण्यात यश आले नाही. त्यामुळे मशिनमधील रोकड सुरक्षित राहिली. ही घटना आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले.चोरट्यांनी यावेळी एटीएम मशिनमधील सीसीटिव्ही कॅमेरे देखील फोडले. तर, एका सीसीटिव्हीला चिकटपट्टी लावली. तसेच एटीएम मशीनची वायरिंग तोडून टाकले. घटनेची माहिती मिळताच औंध पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पुसेसावळी दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास बिट अंमलदार राहुल वाघ करीत आहेत.