शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी टाटांना वाहिली श्रद्धांजली; अखेरच्या निरोपासाठी भलीमोठी रांग
2
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"; राज ठाकरेंचे मोदींना पत्र
3
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
4
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
5
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
6
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
7
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
8
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
9
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
10
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
11
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
12
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
13
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
14
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल
15
"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले
16
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
17
Ratan Tata News : 'ही' ठरली रतन टाटांची अखेरची डील, मिळवला होता २३,००० टक्क्यांचा नफा; कोणता होता व्यवहार?
18
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
19
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
20
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण

Satara Crime: दहिवडीत चोरट्यांनी अख्खं किराणा दुकान लुटलं, सीसीटीव्हीसह मेमरीकार्डही लंपास केलं

By दत्ता यादव | Published: March 16, 2023 7:29 PM

माल चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी चारचाकी आणली होती

सातारा : दुकानातील एक-दोन वस्तू चोरीस गेल्याचे आजपर्यंत आपण ऐकलं असेल. मात्र, अख्खं दुकान कधी चोरीला गेल्याचे ऐकले आहे का, असाच काहीसा प्रकार दहिवडीमध्ये घडलाय. चोरट्यांनी चक्क अख्खं दुकानच लुटून नेलंय. तेल डब्यापासून अगदी मसाल्याच्या पुड्यापर्यंतच्या साऱ्या वस्तू दुकानातून गायब करण्यात आल्या आहेत. एकूण पाच लाखांचा माल चोरट्यांनी हातोहात लांबविला आहे. ही घटना दि. १४ रोजी रात्री मध्यरात्री घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वागत महावीर दोशी (वय २७, रा. स्वामी समर्थ मंदिराच्या शेजारी, दहिवडी, ता. माण) यांचे दहिवडी येथे किराणा मालाचे दुकान आहे. मंगळवार, दि. १४ रोजी रात्री साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान बंद केले. दरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील तेलाचे ४५ पत्र्याचे डबे, साबुदाण्याची ५० किलोची ३ पोती, खोबऱ्याच्या १५ किलोच्या १३ पिशव्या, पाच किलो मसाल्याचा एक बाॅक्स, ६० किलो वजनाच्या बदामाच्या २ पिशव्या, २० किलो वजनाच्या काजूच्या दोन पिशव्या, १० किलो साधे मणुके एकबाॅक्स, २० किलो जीऱ्याचे प्रत्येकी १ किलोच्या २० पिशव्या, ३० किलो तूरडाळ, ३० किलो मूगडाळ, पारले बिस्किटाचे ५ बाॅक्स, साबणाचा एक बाॅक्स, चहा पावडर, ११ किलो खारीक, २७ किलो मिरे, १० किलो बादलफूल असा तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. दुकान मालक स्वागत दोशी हे सकाळी दुकान उघडण्यास आले असता चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर दहिवडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे हे करीत आहेत.

मेमरी कार्डसह सीसीटीव्हीही गायबचोरट्यांनी दुकानातील दोन सीसीटीव्हीसह त्याचे मेमरीकार्डही चोरून नेले. जेणेकरून पाठीमागे पुरावे राहू नये, याची चोरट्यांनी पुरेपूर काळजी घेतली. पाळत ठेवूनच चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

माल नेण्यासाठी चारचाकी...दुकानातून किराणा माल चोरून नेण्यासाठी चोरट्यांनी चारचाकी आणली होती. मात्र, ते वाहन कोणते होते, हे अद्याप पोलिसांना समजले नाही. दहिवडीतील अन्य ठिकाणावरील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. चोरट्यांच्या तपासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, ही पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस