प्रमोद सुकरे ।क-हाड : कृष्णा-कोयना नदीकाठी वसलेला कºहाड तालुका म्हणजे उसाचा पट्टा! त्यामुळे इथं बक्कळ साखर.. इथल्या पेढ्याची चव ‘प्रथम’ चाखली की ती न्यारीच असल्याचं लक्षात येतं. अहो एकमेकांना साखर अन् पेढे भरवून इथं कधी कुणाचं मनोमिलन हुईल अन् कधी इस्कटल, याचा मात्र नेम नाही. त्यामुळेच सध्या उमेदवारांना कुणी साखर किंवा पेढा दिला तर ते दचकतायत म्हणे ! त्याची ‘टेस्ट’सुद्धा न बघता ते इतरांना देताना दिसतायत. याबाबतच्या ‘क्लिप’ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाल्याने उलट-सुलट चर्चांची ‘गोडी’ वाढली आहे.
खरंतर ‘इलेक्शन’ लय वाईट. लय वंगाळ. कोण कुणाला काय म्हणल, याचा नेम नाय; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून नेमकं काय झडलं सांगता येत नाय. उमेदवाराला तर लय तापून चालत नाय, डोक्यावर ‘बर्फ’ अन् तोंडात ‘साखर’ ठेवावी लागते, असं म्हणत्यात. मग तरीपण हे उमेदवार त्यांना दिलेला पेढा अन् साखर स्वत: का खात नाहीत? हा त्यांच्या काही कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न. विरोधक तर काय चुका शोधायलाच बसलेले. त्यात आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल. मग सुरू होतंय सोशल मीडियावर कार्यकर्त्यांच युद्ध; पण सोशल मीडियावरची ही लढाई आपल्या नेत्याला सोसंल का? याचं भान कोणाला दिसेना.
परवा दोन साखर कारखाने उशाला असणाऱ्या एका डॉक्टर बाबांची कºहाडातून भव्य रॅली सुरू होती. जागोजागी उत्स्फूर्त स्वागत सुरू होते. एका ठिकाणी स्वागताप्रीत्यर्थ त्यांना पेढा देण्यात आला म्हणे. गाडीत उभ्या असणाºया त्या बाबांनी भोवती गराडा घालून असणाºया कार्यकर्त्यांकडे तो पेढा खाण्यासाठी टाकला. एवढीच क्लीप मग सोशल मीडियावर फिरू लागली. दुसºयाने दिलेला पेढा हे खात नाहीत. बघता बघता या पेढ्याचा ‘प्रसाद’ कधी झाला समजला नाही अन् संबंधित बाबांना जणू आरोपीच्या पिंज-यातच उभे करण्यात आले.
दुस-या दिवशी इंजिनिअर असणारे बाबा प्रचारासाठी एका कार्यकर्त्यांच्या घरी गेले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला. त्यात बाबांना औक्षण केल्यानंतर एका भगिनीने त्यांच्या हातात साखर दिली. त्यांनी ती साखर पाठीमागे असणाºया आपल्या कार्यकर्त्यांच्या हातात दिली. हे स्पष्ट दिसतंय. मग सुरू झाली चर्चा. हे बाबा दुस-याच्या हातची साखरसुद्धा खात नाहीत. हे काय कामाचे ? पण आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत.
असं तर कुणी सांगितलं नसंल ना ?डॉक्टर बाबांना पेढा हातात पडल्यावर हा पेढा आपल्या संस्थेचा नाही अन् ‘कोयने’चे पेढे तुम्ही यापूर्वी एकदा खाऊन बघितले आहेत. असे तर कोणी सूचित केले नसेल ना? अशी चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाबांना हातात साखर दिल्यावर ही तर आपल्या विरोधकांच्या कारखान्यात तयार झालेली साखर आहे, असं कोणी सांगितले नसेल ना ! या दोघांनीही पेढा अन् साखर खाणे टाळले हे नक्की.
अशी बदलली तोंड गोड करण्याची पद्धत...पूर्वी पाहुणे घरी आले की गूळ द्यायचे, पुन्हा ही जागा गुळाच्या चहाने घेतली. पुन्हा साखरेनं, साखरेच्या चहाने घेतली. पुढे मिठाई आली अन् पेढा, बर्फी देऊन पाहुण्यांचे तोंड गोड होऊ लागले. घरातला माणूससुद्धा शुभ कामाला बाहेर पडताना त्याला साखर, पाणी देण्याची पद्धत अनेक भागात आहे. निवडणूक काळात तर उमेदवार दारात आल्यावर त्याचे तोंड गोड करूनच पाहुणचार अनेक ठिकाणी केला.