शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

तृतीयपंथीयांच्या कपाळी सौभाग्याचं लेणं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:36 PM

सातारा : ज्यांनी आजपर्यंत आपल्या भावनांना बांध घातला, मनानं बाई असूनही पुरुषी हावभावांमुळे समाजाची हेटाळणी सहन केली ते तृतीयपंथी ...

सातारा : ज्यांनी आजपर्यंत आपल्या भावनांना बांध घातला, मनानं बाई असूनही पुरुषी हावभावांमुळे समाजाची हेटाळणी सहन केली ते तृतीयपंथी सोमवारी साताऱ्यात स्वाभिमानानं नटले. सौभाग्याचं लेणं कपाळी लेऊन ते ताठ मानेनं उभे राहिले. महिलांकडून वाण स्वीकारून त्यांनी स्त्रीत्वाचा खरा दागिना मिळवला आणि हा हृदय सन्मान सोहळा सातारकरांनी अभिमानानं अनुभवला.‘लोकमत’ व जाणीव सामाजिक तृतीयपंथी विकास संस्थेने तृतीयपंथींना मान, सन्मान मिळून देण्यासाठी सोमवारी शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सातारकर महिलांनी सहभाग नोंदवल्याने तृतीयपंथीयांना प्रथमच सवाशीण होण्याचे भाग्य लाभले. तृतीयपंथींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सातारकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, हे विशेष. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संविधान पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, ‘तृतीयपंथीयांनी स्वत:चे उद्योगधंंदे उभे करून स्वत:ला सिद्ध करावे. त्याच्या माध्यमातून समाजव्यवस्थेला आपली दखल घेण्यास भाग पाडले पाहिजे. समाजात तुमचे अस्तित्वही अधोरेखित होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्यासाठी जनकल्याण प्रतिष्ठान कायम पाठीशी राहील.कार्यक्रमात रेणू राय येळगावकर, प्रशांत वारकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जाणीव संस्थेच्या अध्यक्षा सुनीता भोसले, सचिव राहुल भोसले, राष्ट्रीय किन्नर समाज जन पार्टीचे अध्यक्ष प्रशांत वारकर, बबलू जाधव, शोभा केंडे, लीना भोसले, माधवी शेटे, वैशाली भोसले, रत्नमाला पोवार, मेघा खरात, सुरेखा मोरे, शोभा गुजर, सुषमा जाधव, वर्षा पवार, वैशाली जाधव, अंनिसच्या वंदना माने, विवेकवाहिनीच्या शामली माने आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे संस्थापक भारत भोसले यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम घेण्यामागची भूमिका सविस्तरपणे विशद केली. ज्योती अडागळे आणि राधा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचे संयोजनया कार्यक्रमाचे पालकत्व स्वीकारून शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाने नेटके संयोजन केले होते. उपस्थितांना बसण्याची सोय शाळेच्या प्रांगणात करण्यात आली होती. त्यासाठी प्रशस्त मंडपही घालण्यात आला होता. शाळेतील आजी-माजी विद्यार्थीही यात सहभागी झाले. रांगोळी काढण्यापासून, येणाºया प्रत्येकाचे आदरातिथ्य करण्यासाठी शाळा कर्मचारी सज्ज होते.महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादराज्यातील पहिल्याच अनोख्या अशा उपक्रमात शाहूपुरी परिसरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. यावेळी परिसरातील महिलांनी तृतीयपंथीयांना हळदी कुंकू लावून वाण लुटले. पहिल्यांदाच होत असलेला हा हृदय सोहळा मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेकांची धडपड दिसत होती. सातारा शहरासह उपनगरांतून ‘लोकमत’मधील बातमी वाचून कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांचीही संख्या मोठी होती. माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सुमारे तीन तास हा कार्यक्रम रंगला.मेकअप किटने सुखावले...!एक कोशिश टीमच्या वतीने साताºयात नुकताच पतंग महोत्सव झाला. या कार्यक्रमातून उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी मेकअपचे किट उपलब्ध करून देण्यात आले. मेकअपचे किट पाहून सर्वच तृतीयपंथी सुखावले. यासाठी रेणू राय-येळगावकर, विद्या धुमाळ, सोनल झिंब्रे, सारिका चांडक, ऐश्वर्या पाटील, अश्विनी राठी, तेजस्विनी पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.