शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

मलकापूरला रात्रीत तेरा चोऱ्या

By admin | Published: July 07, 2014 11:05 PM

चोरट्यांचा धुमाकूळ : पतसंस्था, फ्लॅट, बांधकाम कार्यालय, दुकाने फोडली

मलकापूर (जि. सातारा) : शहरातील कोयना वसाहत परिसरात काल, रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत त्यांनी तीन पतसंस्था, सात फ्लॅट, बांधकाम कार्यालय व दोन दुकाने फोडली. दरम्यान, चोरट्यांनी फोडलेले सर्व फ्लॅट बंद असल्याने त्यातील किती ऐवज चोरीस गेला, याबाबतची पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली नव्हती. मात्र, पतसंस्था, आॅफिस व दुकानातून सुमारे लाखाचा ऐवज लंपास झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मलकापूर येथे चोरट्यांनी सुरुवातीला मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्था फोडली. या संस्थेतील ७६ हजारांची रोकड लंपास केली. त्यानंतर कृष्णा-कोयना व जनकल्याण पतसंस्थेचे शटर उचकटून दोन्ही संस्थांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, दोन्ही पतसंस्थांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी फ्लॅटकडे मोर्चा वळविला. भाग्यश्री अपार्टमेंटमधील गायकवाड कुटुंबीयांचा एक बंद फ्लॅट, सुयश रेसिडेन्सीमधील तीन बंद फ्लॅट, ओमकार अपार्टमेंट, सुयश प्लाझामधील प्रत्येकी एक फ्लॅट चोरट्यांनी फोडले. त्याचबरोबर कोयना औद्योगिक वसाहतीजवळील ‘चंदन प्लाझा’ इमारतीमधील मिलिंद नारायण देवळेकर यांच्या मालकीचे फॉर्मिंग ज्वेलरीचे दुकान फोडले.चोरट्यांनी दुकानातील बांगड्या, नेकलेस, चांदीच्या अंगठ्या, मोती आणि पोवळ्यांची माळ, असा सुमारे २५ हजारांचा ऐवज लंपास केला. तेथून जवळच असलेल्या वक्रतुंड अपार्टमेंटमधील सी. बी. कन्स्ट्रक्शनचे कार्यालय फोडून २० हजारांचा जनरेटर व लक्ष्मी पूजनासाठी कायमस्वरूपी ठेवलेली दोन हजारांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली. विवेक रामचंद्र जगताप यांच्या वाहनांच्या सुट्या भागांचे दुकान फोडून काही ऐवज लंपास केला.या घटना आज, सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली. पतसंस्था, ज्वेलरी दुकान, कन्स्ट्रक्शन आॅफिस व स्पेअर पार्ट दुकानातील चोरीस गेलेल्या मालाची नोंद केली. मात्र, फोडलेल्या सातही फ्लॅटच्या मालकांविषयी पोलिसांना आज रात्री उशिरापर्यंत माहिती मिळाली नाही. त्यामुळे फ्लॅटमधून चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील पोलिसांना समजू शकला नाही. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)