शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

जावळीत दगडांची झाली फुले! मानकुमरे उदयनराजेंच्या प्रचारात : मतभेद विसरून होणार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 1:04 PM

राजकारणात कोणीही कायमस्वरुपी शत्रू नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून, राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी खांद्याला खांदा लावून जावळीत

ठळक मुद्देराजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हेच सिद्ध होते, अशी चर्चा सातारा,

सातारा : राजकारणात कोणीही कायमस्वरुपी शत्रू नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून, राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी खांद्याला खांदा लावून जावळीत प्रचारास सुरुवात केली. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ या वळणावर, असे म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या साक्षीने दोघांनी मैत्रीचे संबंध पुनर्स्थापित केले. दरम्यान, यामुळे जावळीत दगडांची झाली फुले, अशी चर्चा आता ऐकायला मिळू लागली आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातून खासदार उदयनराजे भोसले हे तिसºयांदा राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याशी त्यांची वादावादी झाली होती. तसेच उदयनराजे व त्यांच्यात राजकीय भूमिकेवरून मतभेद निर्माण झाले. हे मतभेद गेल्या दीड वर्षात अगदी टोकापर्यंत गेले होते. वाहनांवर दगडफेक करण्यापर्यंत प्रकरण गेले होते. एवढेच नव्हे तर पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद गेला होता. 

त्यावेळी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत होत्या. या दोन नेत्यांचा संघर्ष टोकाचा झाला होता. त्यामुळे पोलिसांना हे दोन नेते कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना प्रचंड खबरदारी घ्यावी लागत होती.मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाले गेले विसरून हे दोन्ही नेते जावळी तालुक्यातील प्रचार दौºयात सक्रिय झाल्याने नागरिकही आवक झाले आहेत. 

मेढा, करहर, कुडाळ, हुमगाव, म्हसवे, बामणोली आदी ठिकाणी झालेल्या प्रचार सभा, बैठका व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना ते दिसून आले. तसेच ऐकमेकांशी दिलखुलासपणे चर्चा करीत असताना दिसले. त्यामुळे राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हेच सिद्ध होते, अशी चर्चा सातारा, जावळी तालुक्यांमध्ये सुरू आहे. 

टॅग्स :satara-pcसाताराLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक