सातारा: विविध मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करणाºया ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील (वय ५६, रा. कृष्णानगर सातारा) यांच्या खूनप्रकरणी तपासात वेगवेगळी माहिती समोर येत असून, जया पाटील यांना ज्यांनी वारंवार फोन केले, अशा लोकांकडे पोलिसांनी तपास केंद्रीत केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घराच्या आजूबाजूला असलेले सर्वच सीसीटीव्ह बंद असल्याने पोलिसांकडून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अभिनेत्री जया गणेश गायकवाड- पाटील यांचा कृष्णानगर येथील गजानन हौसिंग सोसायटीमध्ये बंगला आहे. या बंगल्यात त्या एकट्याच वास्तव्यास होत्या. शनिवारी मध्यरात्री त्यांचा अज्ञाताने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळी सहा पथके तयार केली असून, प्रत्येकजण या खूनप्रकरणात अनेक शक्यता पडताळून पाहत आहेत. जया पाटील यांचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला असून, त्यांच्या मोबाईलवर ज्यांनी वारंवार फोन केले, अशा लोकांकडे पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय. त्या एकट्या राहत असल्यामुळे त्यांचा कोणाशी वारंवार संपर्क येत होता, याची माहितीही पोलिसांनी घेतली आहे. संबंधित व्यक्तींची शंकास्पद वर्तवणूक आणि व्यवहार पोलिसांच्या चाणाक्ष्य नजरेने टीपले आहेत. त्यामुळे लवकरच या खूनप्रकरणाचा उलगडा होणार आहे.
चौकट : सीनेक्षेत्रातील सहकाºयांशीही चौकशी...
अभिनेत्री जया पाटील यांच्या घराच्या परिसरात तीन सीसीटीव्ही आहेत. हे तिन्हीही सीसीटीव्ही सध्या बंद अवस्थेत आहेत. जाणूनबुजून हे सीसीटीव्ही कोणी बंद केले तर नाही ना, या शक्यतेनेही पोलीस तपास करत आहेत. खबºयांनाही पोलिसांनी सतर्क केले आहे. जया पाटील यांच्यासोबत सीनेक्षेत्रात काम करणाºया सहकाºयांशीही एक टीम चौकशी करत आहे. अशा सर्व बाजूंनी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.