शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

‘त्या’ हल्लेखोरांनी हाॅटेल व्यावसायिकावरही रोखली बंदूक, तपास अंतिम टप्प्यात; तपासासाठी पाच पथके रवाना

By दत्ता यादव | Published: January 25, 2023 9:13 PM

सातारा : जुन्या गाड्यांचा खरेदी- विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित   भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा ) यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी एका ...

सातारा : जुन्या गाड्यांचा खरेदी- विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित   भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी एका हाॅटेल व्यावसायिकावरही बंदूक रोखली होती. ही धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. हल्लेखोरापर्यंत पोलिस पोहोचले असून, हा तपास अंतिम टप्प्यात असल्याचे पोलिस सांगतायत.

व्यावसायिक अमित भोसले हे सोमवारी रात्री त्यांच्या मैत्रिणीसमवेत वाढे फाट्यावरील एका हाॅटेलमध्ये गेले होते. त्यावेळी दोघा हल्लेखोरांनी अमित भोसले यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, त्यातूनही ते वाचल्याने त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला. हा प्रकार तेथे उपस्थित असलेले हाॅटेल व्यावसायिक पाहत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्या हाॅटेल व्यावसायिकावरही बंदूक राेखून त्यांना धमकावले. यानंतर त्यांच्या हाॅटेलमधील कांदा कापण्याची सुरी घेऊन तेथून हल्लेखोर पसार झाले. 

दरम्यान, अमित भोसले यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत. दोघे हल्लेखोर साताऱ्यातील बऱ्याच सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे चोरट्यांचा तपास अंतिम टप्प्यात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अमित भोसले हे रात्री जेवण करण्यासाठी मैत्रिणीसोबत बाहेर पडणार होते. हे ज्यांना माहिती होते. त्यांनीच हा खून केला असल्याचे तपासात समोर येत आहे.

टॅग्स :satara-acसातारा