कराड/कोयनानगर : गत विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाशी विश्वासात केला. तत्वाशी संबंध नसणाऱ्या त्रिकूटाने सत्ता स्थापन केली. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांचाच पराभव झाला असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. कोयनानगर ता.पाटण येथे आज, सोमवारी कालवा समितीची बैठक आयोजित केली होती. त्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची झालेली निवड अनपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. याविषयी माध्यमांनी छेडले असता विखे- पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा तेही राज्याला माहित नव्हते. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीनंतर त्यांनी केलेले भाष्य योग्य वाटत नाही.उलट ज्यांनी - ज्यांनी काँग्रेसमध्ये राहून सत्ता भोगली त्यांनी आता हात वर केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून तर काँग्रेसची अधोगती सुरू झाली अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.काँग्रेसचेच लोक किती मदत करतात हा खरा सवालहर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असली तरी त्यांना काँग्रेसचेच लोक किती मदत करतात हा खरा सवाल आहे. असेही एका प्रश्नाला उत्तर देताना विखे- पाटील यांनी सांगितले.
भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांचाच पराभव झाला - राधाकृष्ण विखे-पाटील
By प्रमोद सुकरे | Updated: February 17, 2025 19:48 IST