पांचगणी : धनुष्यबाण नेहमी बाळासाहेबांचा राहिला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी त्याग केला. त्यांना धनुष्यबाण मागण्याचाही अधिकार नाही. जे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. त्यांना ना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार आहे, ना धनुष्यबाण वापरायचा अधिकार आहे, अशा शब्दात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला. तसेच, महाराष्ट्रात झालेलं मोठ बंड हे बाळासाहेबांच्या विचारासाठीच झाल्याचा पुनरुच्चारही केसरकर यांनी केला.
पाचगणी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या सांगता समारंभास शालेय मंत्री दिपक केसरकर आले होते यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचबरोबर नितीन भाई भिलारे यांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले हे पक्षांतर्गत बंड होत. माझी खात्री आहे भविष्यात सर्वच्या सर्व शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारासोबत रहातील. बाळासाहेबांनी मला एकदा पंतप्रधान करा मी ३७० कलम एका दिवसात रद्द करतो. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांशी बाळासाहेबांचा विचार पक्का होता. असे सांगून ते पुढे म्हणाले वैष्णव देवीची यात्रा दहशतवाद्यांनी थांबवली. तेव्हा बाळासाहेबांनी एकच सांगितले एकही विमान हज साठी उडणार नाहीं. हिंदुत्वासाठी त्यांनी ठाम निर्णय घेतले. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे कोणत्याही धर्मावर अधारीत नव्हते. जो हिंदुस्थानवर प्रेम करतो तो हिंदू. तेच हिंदुत्त्व सोडून तुम्ही काँग्रेसच्या पुढाऱ्याला काश्मीर मध्ये जावून मिठी मारणार असाल तर बाळासाहेबांचे काय शिल्लक रहाणार आहे. महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात हे पाप कधीही फेडल जावू शकत नाही. अस मला स्वतःला वाटत.
केसरकर पुढे म्हणाले, उद्या बाळासाहेबांची जयंती आहे. त्यांच्या विचारांचे स्मरण ठेवण आणि त्याची अंमबजावणी करण हीच आत्ताच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या संदर्भातली खरी आदरांजली ठरेल.आणि आमचा जो क्लेम आहे. तो जूनियन क्लेम आहे. कुठल्याही पक्षाचे अस्तित्व तो राज्यस्तरावरचा आहे. की देश स्तरावरचा त्या पक्षाला मिळालेल्या मतांवर ठरतं. किती आमदार व खासदार निवडून आले. यांना किती मते मिळाली. यावर त्या पक्षाला रिकगनेशन दिलं जातं. ज्याच्याकडे जास्त आमदार, खासदार आहेत, त्यालाच रिकगनेशन दिलं जातं असेल तर त्याला तो न्याय मिळाला पाहिजे, आणि तो आम्हाला मिळेल याची खात्री आहे.