सातारा : ‘संन्याश्याच्या आचरणातून ज्याकाही जाणीवा धार्मीकतेने स्फूट होतात व त्यातून समाजावर परिणाम होतो व त्या परिणामातून जी काही जाणीव निर्माण होते. त्याला राष्ट्रधर्म म्हणतात. व हे काम स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी केले आहे,’ असे विचार प्रा. डॉ. यशवंत पाठक यांनी व्यक्त केले.श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड दरवर्षी संतांच्या मार्गदर्शक विचारांचे प्रबोधन व प्रसार करणाऱ्या व्यक्तीस प्रतिवर्षी समर्थ संत सेवा पुरस्कार देऊन गौरविते.यावर्षीचा समर्थ संत सेवा पुरस्कार फुलगाव, पुणे येथील वेदांत साहित्याचे अभ्यासक समर्थ भक्त स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना पुणे येथील उद्यान मंगल कार्यालयात श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस यांच्या अध्यक्षतेखाली व संत ज्ञानेश्वर अध्यासन, पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. यशवंत पाठक यांचे हस्ते वितरित करण्यात आला.मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त मारुती बुवा रामदासी, कार्याध्यक्ष अॅड. डी. व्ही. देशपांडे, समर्थ भक्त माधवराव अभ्यंकर, सज्जनगड मासिकाचे कार्यकायरी संपादक, मधु नेने यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. डॉ. डी. व्ही. देशपांडे यांनी आपल्या स्वागत पर भाषणात मंडळाच्या या पुरस्कारांची माहिती दिली. सत्काराचे वेळी मानपत्राचे वाचन दीपा भंडारे यांनी केले. २१ हजार रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त असे या पुरस्काराचे स्वरूप होते.याच समारंभात मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. डी.व्ही. देशपांडे, अजित कुलकर्णी यांचा गुरुनाथ महाराज कोटणीस यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.मारुती बुवा रामदासी व नरेंद्र नरेवाडीकर यांनी गायलेल्या कल्याणकरी रामराया या प्रार्थनेने सोहळ्याची सांगता झाली. समारंभास समर्थ भक्त अरविंद बुवा अभ्यंकर, गोविंदराव बेडेकर, अरुण कुलकर्णी, श्रीनिवास हळबे, डॉ. अजित कुलकर्णी, गजानन बोबडे, मधुकर बाजी, बाब बलशेठवार, श्रीकांत साखरे, नरेवाडीकर, मुकुंद लांडगे, राजू कुलकर्णी, रवी आचार्य यांचेसह राज्यातील विविध ठिकाणाहून आलेले समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारंभाचे मधू नेने यांनी सूत्रसंचालन केले.श्रीराम सबनीस यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
राष्ट्रधर्माची जाणीव स्वरूपानंदांनी दिली
By admin | Published: December 29, 2015 9:59 PM