औंध : औंध येथील श्री यमाईदेवीच्या यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरविण्यात आला. यामध्ये विविध जातींचे बैल, गायी तसेच इतर जनावरे मोठ्या प्रमाणात आणली गेली होती. यंदा जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला असून, आठ ते दहा हजार जनावरे दाखल झाली. मागील तीन दिवसांपासून लाखो रुपयांची उलाढाल सुरू झाली.औंध ग्रामपंचायत, ग्रामस्थ, यात्रा कमिटी व कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने औंध ते पुसेगाव व औंध ते खबालवाडी रस्त्यावर हा बाजार भरला. औंध येथील श्री यमाईदेवीच्या यात्रेनिमित्त भरणाऱ्या बैलबाजारास पश्चिम महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. सुमारे दहा ते पंधरा दिवस हा बैलबाजार यात्रेनिमित्त भरविला जातो. ती परंपरा अनेक वर्षांपासून टिकून आहे.यात्रेनिमित्त येणारे शेतकरी, जनावरांना श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज बाजार समितीचे सभापती रवींद्र सानप, उपसभापती डॉ. प्रकाश पाटोळे, सचिव शरद सावंत, एस. व्ही. सर्वगोड, विजय गोडसे, एस. जी. कांबळे, जितेंद्र चव्हाण, सरपंच नंदिनी इंगळे, उपसरपंच सचिन शिंदे यांनी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.यामध्ये पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, जागा, हॅलोजन बल्ब तसेच अन्य भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यात्रेमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतील शेतकरी, व्यापारी मोठ्या प्रमाणात जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी दाखल झाले आहेत.यामध्ये जातिवंत खिलार जनावरे, कर्नाटकातून कोशा, गौळाऊ, देवणी प्रकारची जनावरे, खरसुंडी, आटपाडी, माणदेशी खिलार तसेच आंध्र, तेलंगणा राज्यांतून जनावरे आणली आहेत. यंदा उलाढाल चांगली झाली असून, शेतकरी, व्यापाºयांमध्ये खरेदी-विक्रीसाठी उत्साह असल्याची माहिती माहिती बाजार समितीचे सचिव शरद सावंत यांनी दिली.यात्रा काळात जनावरांना कोणत्याही प्रकारच्या रोगाचा, आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बापूसाहेब नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.शंभर वर्षांची परंपरामहाराष्ट्र व विविध राज्यांतून खरेदी-विक्री व्यवहार करणारे शेतकरी, व्यापारी येतात. खिलार व देखणी जनावरे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.
औंधच्या बाजारात दहा हजार जनावरे दाखल, लाखोंची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 4:05 PM
औंध येथील श्री यमाईदेवीच्या यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरविण्यात आला. यामध्ये विविध जातींचे बैल, गायी तसेच इतर जनावरे मोठ्या प्रमाणात आणली गेली होती. यंदा जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला असून, आठ ते दहा हजार जनावरे दाखल झाली. मागील तीन दिवसांपासून लाखो रुपयांची उलाढाल सुरू झाली.
ठळक मुद्देऔंधच्या बाजारात दहा हजार जनावरे दाखल, लाखोंची उलाढालयमाईदेवीच्या यात्रेत खिलार जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री