आॅनलाईन लोकमतम्हसवड : गोंदवले खुर्द, ता माण येथील विद्युत वितरण कंपनीचे दारं कधी उघडणार आणि साहेब येणार कधी, याकडे ग्राहक डोळे लावून बसलेले असतात. शाखाधिकारी नसल्याने या कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. वरिष्ठ अधिकारीसुद्धा याबाबत कानाडोळा करत असल्याने या कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत असल्याने यावर मार्ग निघणार का?, असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे.
गोंदवले खुर्दमध्ये विद्युत वितरण कंपनीच शाखाधिकारी कार्यालय असून, कार्यालयातील शाखाधिकाऱ्यांची बदली झाल्याने सध्या हे कार्यालय शाखाधिकाऱ्यांच्या विना ओस पडलेले असून, कधी तरी उघडल्या जाणाऱ्या या कार्यालयात शाखाधिकारी एक लाईनमन आणि सुमारे आठ वायरमन काम करतात या कार्यालयाच्या अंतर्गत गोंदवले बुद्रुक, वाघमोडेवाडी, नरवणे काळेवाडी, कचरेवाडी, दोरगेवाडी, गोंदवले खुर्द किरकसाल, धामणी, ढाकणी, पिंपरी, पिसाळवस्ती पळशी, जाशी, लोधवडे या ठिकाणचे हजारो वीज ग्राहक आहेत. वरील प्रत्येक गावातील लोक घरगुती आणि शेती विजेच्या कामासाठी गोंदवले खुर्दच्या कार्यालयात येत असतात.
कुणाला स्वत:च्या घरातनवीन मीटर घेऊन विद्युतपुरवठा जोडणी घ्यायची असते तर अनेकांना स्वत:च्या रानात विहिरीवर किंवा विंधन विहिरीवर नवीन मोटार बसवण्यासाठी कनेक्शन घ्यायचे असते तर अनेकांना पूर्वीच्या जोडणीत काय दोष असतील तसेच मीटर नादुरुस्त असेल व त्यामुळे येणारे विद्युत बिल जास्त येत ते रिडींगप्रमाणे कमी करून घेण्याच्या कामासाठी सतत लोक हेलपाटे मारत असतात; मात्र सगळ काम सोडून लवकर आलेला ग्राहक कधीच काम होऊन आनंदी मनानं परत गेलाय असं होत नाही. ग्राहक आल्या-आल्या त्याला प्रथम कार्यालय शोधावं लागतं. त्यानंतर कार्यालय सापडल्यावर ग्राहक जरा खूश होतो; पण बराच वेळ झाला तरी कार्यालय उघडत नाही; मग मात्र ग्राहक असपास चौकशी करू लागतात ह्यआॅफिसह्ण कधी उघडणार ह्यसाहेबह्ण कधी येणार ही चौकशी सुरू असतानाच एखादा वायरमन अचानक कार्यालयाजवळ येतो अन् कार्यालय उघडलं जातं; मात्र साहेबच नसण्यानं लोकांची काम खोळंबतात किमान कार्यालयात असणाऱ्या ह्यवायरमनह्ण यांनी तरी आपल्या कार्यालयीन ठिकाणी हजर असणे गरजेचे असताना हेही नसतात; मात्र वायरमनच्या जेवढं अखत्यारित आहे, तेवढं काम होतं पण पुढे काय ? ज्या अधिकाऱ्याकडे या कार्यालयाचा जादा अधिभार दिलेला आहे, त्यांना त्यांची इतर कामे सोडून येता येत नाही आणि आले तर त्यांचा सगळा वेळ केवळ रजिस्टर पाहण्यात निघून जातो. ग्राहकांची कामे तशीच पडून राहतात. ग्राहकांना फक्त हेलपाटे मारावे लागतात. या हेलपाट्यानं लोकांचं आर्थिक नुकसान होत असत आणि मानसिक संतुलन ढासळत आहे.या कार्यालयाची ग्राहकांकडे वीज बाकी; पण खूप थकित आहे ही थकित बाकी वसूल व्हावी म्हणून वीजवितरणचे अधीक्षक साळे, वडूज येथील यादव, दहिवडी येथील सहायक अभियंता सोनावणे यांनी सर्वांनी कार्यालयाला अचानक भेट दिली आणि वसुलीसंदर्भात आढावा घेतला व वसुलीसाठी दुसऱ्याच दिवशी वडूज कार्यालयातील काही कर्मचारी पाठवून दिले व त्यांनी दोन दिवसांत सुमारे लाख भर रुपये वसूल केले. ज्यांनी थकित बाकी भरली नाही, त्यांचा विद्युतपुरवठा खंडित केला, असा प्रयोग वसुलीसाठी राबवला त्याचप्रमाणे सेवा देण्याबाबत पण कार्यतत्परता दाखवली पाहिजे, अशी चर्चा ग्राहक करत होते.शाखाधिकारी कधी मिळणार?गोंदवले खुर्द याठिकाणी कार्यालयीन काम पण खूप अलबेल असतं. गावातील रस्त्याच्या खांबांवरील विद्युतपुरवठा गेले दोन दिवस बंद आहे. या ठिकाणी कुठे घोटाळा झालाय, हेच सापडेना संपूर्र्ण गाव अंधारात असून कोण लक्ष देत नाही, हेच मोठं आश्चर्य आहे. गोंदवले शाखाधिकारी कार्यालयाला शाखाधिकारी मिळणार का ?असा प्रश्न वीजग्राहकांना पडला आहे. या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्या वीजबिलाची वसुली करण्यात जशी तत्परता दाखवली जात आहे, तशी वीज ग्राहकांच्या समस्या सोडवायला दाखवली तर अधिकाऱ्यांवरचा कामाचा बोजा वाढणार नाही व वीज ग्राहक ही समाधानी होईल. तरी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या कार्यालयाला कायमस्वरुपी अधिकारी देऊन लोकांच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न करून लोकांना सेवा द्यावी.- वीज तक्रारदार