शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

महापालिका बॉम्बने उडविण्याची धमकी

By admin | Published: February 23, 2016 12:41 AM

दोन टपालांनी खळबळ : पत्रे संजयनगरमधून पाठविल्याचे स्पष्ट

सांगली : येत्या २८ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या सांगलीतील मुख्यालयाची इमारत बॉम्बने उडविण्याची तसेच शहरात अन्यत्र बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारी दोन वेगवेगळी पत्रे महापालिकेला सोमवारी प्राप्त झाल्याने खळबळ माजली आहे. या पत्रांवर संजयनगरचा पत्ता असून लष्कर-ए-तोयबा आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांच्या नावांचा वापर यासाठी करण्यात आला आहे. महापालिकेने याबाबत जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार केली आहे. महापालिकेला गेल्या चार वर्षांत धमकीची एकूण सहा पत्रे प्राप्त झाली आहेत. सोमवारी तशीच पत्रे प्राप्त झाल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. या पत्रांवर संजयनगरचा पत्ता असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेची इमारत उडविण्याबरोबरच शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचा उल्लेख पत्रात आहे. दोन वेगवेगळ्या संघटनांची नावे टाकून ही पत्रे पाठविली असली तरी, दोन्ही पत्रांवरील हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे आहे. त्यामुळे कुणीतरी खोडसाळपणे ही पत्रे पाठविल्याची चर्चा आहे. तरीही महापालिकेने या पत्रांबाबतची तक्रार जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्याकडे केली आहे. पोलीस आता या पत्रांचा तपास करीत आहेत. महापालिकेत ही पत्रे पोहोचताच खळबळ माजली. काहींनी या पत्रांवर विनोद केले, तर काहींनी या टपाल प्रकरणाचा छडा लागण्याची अपेक्षा व्यक्त केली. अशा पत्रांची डोकेदुखी कायमची बंद होण्याच्यादृष्टीने बंदोबस्त करावा, अशी मागणी महापालिका प्रशासनाने पोलीसप्रमुखांकडे केली आहे.