सातारा : सेंट्रिंग कामाचे दोन लाख रुपये देण्याची मागणी करून टाळाटाळ करत साहित्य जबरदस्तीने ठेवल्याप्रकरणी मालगावच्या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी रमेश शरणाप्पा नाटेकर (रा. शाहूपुरी, मूळ रा. गुलबर्गा जिल्हा कर्नाटक) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, दुकानगाळे, घरातील सेंट्रींगचे काम करून दिल्याचे २ लाख १९ हजार रुपये संबंधितांकडे वेळोवेळी मागण्यात आले. मात्र, संबंधितांनी टाळाटाळ केली. तसेच सेंट्रिंगचे साहित्य जरबदस्तीने स्वत:कडे ठेवत विश्वासघात केला. त्याचबरोबर शिवीगाळ करत घराकडे आल्यास तंगडी तोडू, अशी धमकीही देण्यात आली.
दरम्यान, या तक्रारीनंतर पोलिसांनी मंगेश दिनकर हवाळ (वय ५५) आणि सुनीता मंगेश हवाळ (दोघेही रा. मालगाव, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
............................................................