शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

पोवई नाक्यावर तीन दिवस चित्रीकरण!

By admin | Published: February 19, 2015 10:05 PM

प्रशासन लागले कामाला : बकालपणाला शोधणार कायमचे उत्तर

सातारा : वाहतूक कोंडीचे दुखणे सोसणारा साताऱ्यातला पोवई नाका आता मोकळा श्वास घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘लोकमत’ने येथील वाहतूक कोंडीवर मांडलेल्या वृत्ताची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोवई नाक्यावर उड्डाणपुलासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. पोवई नाक्यावरील वाहतुकीचे सलग तीन दिवस चित्रीकरण करून शासनाकडे सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. पोवई नाक्यावरील वाहतूक कोंडी वाढतच आहे. या ठिकाणी एकूण आठ रस्ते मिळतात. पोवई नाक्यापासून मध्यवर्ती बसस्थानक, कोरेगाव, लोणंद, कऱ्हाड, सातारा शहर, सिव्हिल हॉस्पिटल, आरटीओ आॅफिस याठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते फुटले आहेत. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पोवई नाक्यावरील कोंडी वाढत आहे. वाहने वाढली असली तरी रस्ते तेवढेच असल्याने वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस आणखी गुंतागुंतीचा होत चालला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील मागील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर असताना ‘लोकमत’ ने पोवई नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला होता. याठिकाणी उड्डाणपूल तयार झाल्यास येथील वाहतुकीला शिस्त लागेल, असा युक्तिवादही या वृत्ताद्वारे मांडला होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी या वृत्ताची दखल घेऊन बांधकाममंत्र्यांची विश्रामगृहावर भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पोवई नाक्यावर उड्डाणपूल होणे किती गरजेचे आहे, हे स्पष्ट केले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रात्री पोवई नाक्यावर प्रस्तावित उड्डाणपुलाच्या जागेची पाहणी केली. तसेच त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या.दरम्यान, यानंतर बुधवारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद राजभोज, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट तसेच इतर अधिकाऱ्यांनी पोवई नाक्यावर पाहणी केली. येथील वाहतुकीबाबत कन्सल्टंट नेमून व्हिडिओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून येथील वाहतुकीचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोवई नाक्यावरील उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी तीन पर्याय खुले आहेत. त्यामध्ये बसस्थानक ते गोडोली रस्ता, सातारा जिल्हा परिषद ते पोवई नाका, अथवा प्रशासकीय इमारत ते पोवई नाका अशा तीन रस्त्यांपैकी एका रस्त्यावर उड्डाणपूल तयार करता येईल का? याबाबत विचारविनिमय करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)असे होईल चित्रीकरणपोवई नाक्यावर सकाळी ६ ते रात्री १२ यावेळेत व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येईल. नाक्यावर वेगवेगळ्या अँगलमधून हे चित्रीकरण करण्यात येईल, याचा अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहे.पोवई नाक्यावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. याठिकाणी उड्डाणपूल तयार झाल्यास निश्चितपणे वाहतूक सोयीची होईल. उड्डाणपूल बांधण्यासाठी लागणारा प्रस्ताव अद्याप तयार झालेला नाही. यासाठी कन्सल्टंट नेमून वाहतुकीचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. पोवई नाक्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्य कायम ठेवून या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.- शरद राजभोज, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, सातारा