कोरेगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरातील व्यापारपेठ व तहसील कार्यालय आवारात उच्छाद मांडून लोकांच्या हाताचा चावा घेणारी तीन माकडे वन विभागाने बुधवारी पिंजऱ्यात बंद केली. प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात पिंजरा लावून ही माकडे पकडण्यात आली. पकडलेली माकडे पाहण्यास नागरिकांनी गर्दी केली होती.
शहरातील व्यापारपेठ, तहसील कार्यालय आवारात शनिवारी आणि सोमवारी दोन माकडांनी ठाण मांडले होते. येणारे-जाणाऱ्यांचा पाठलाग करून ते त्यांच्या हाताचा चावा घेत होते. लहान मुलालाही त्यांनी सोडले नव्हते. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. या माकडांच्या उच्छादामुळे भीतीचे वातावरण होते.वनविभागाकडे तक्रारी गेल्यानंतर वनक्षेत्रपाल राजीव आटोळे यांनी याची गांभीर्याने दखल घेत माकडे पकडण्यासाठी पथक बोलविले होते. बुधवारी दुपारी वन विभागाने प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात पिंजरा लावला होता. त्यामध्ये फळे ठेवण्यात आली होती. सुरुवातीला एक मोठे माकड फळाच्या आकर्षाने पिंज-यात गेले आणि ते अडकले.
पकडलेल्या माकडाला वन विभागाच्या कार्यालयात ठेवलेल्या मोठ्या पिंजºयात ठेवून आल्यानंतर पुन्हा पिंजरा लावण्यात आला. त्यात दुसरे माकडदेखील सापडले. वन विभागाच्या या कारवाईत वनक्षेत्रपाल राजीव आटोळे, परिमंडळ अधिकारी सचिन शिडतुरे, विजय नरळे, वनरक्षक राम शेळके आणि दत्ता चव्हाण यांनी भाग घेतला. वनविभागाने ही माकडे नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे स्पष्ट केले.अन्य माकडांचाही हल्लापिंजºयाचा दरवाजा बंद झाल्याचा जोरात आवाज झाल्याने त्याच्याबरोबरची अन्य माकडे चिडली. ते परिसरातील नागरिकांच्या अंगावर जात ओरडत होती, त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली.कोरेगाव प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात बुधवारी वनविभागाने त्रास देणाºया माकडांना पकडले.