खंडाळा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरील खंडाळ्याजवळ उभ्या ट्रकला भरधाव जीपने पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात जीपमधील तिघे जागीच ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी दोघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी होते.याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथून एक लग्न सोहळा करून काहीजण मुंबईला जीपमधून निघाले होते. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास खंबाटकी बोगदा ओलांडून जीप खंडाळ्याजवळच्या जुन्या टोलनाक्याजवळ आली. यावेळी भरधाव जाणाऱ्या जीपने (एमएच ४७ एबी १७८४) महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला (केएल १६ यू ४४२०) पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात जीपच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन प्रवासी आतमध्येच दबले गेले.या अपघातात विलास शंकर सामंत (वय ६२, रा. पाट, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. सध्या रा. मुंबई), बाळकृष्ण शंकर सामंत (६४, रा. दहिसर मुंबई) आणि विनायक गंगाधर कामत (७४, रा. तळवडे, ता. सावंतवाडी. सध्या रा. मुंबई) हे तिघेजण जागीच ठार झाले. तर विनायक कामत यांची पत्नी स्मिता कामत ( ७२) आणि चालक रवी गवाणकर (रा. जुहू, मुंबई) हे दोघे गंभीर जखमी आहेत.या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना खंडाळा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामधील जखमी असणाºया स्मिता कामत यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश कदम हे या अपघाताचा तपास करीत आहेत.
खंडाळ्याजवळ अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:17 PM