ठळक मुद्देस्ते व परिवहनविषयक कामांबाबत आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामांसाठी तीन हजार कोटींना, तर ठाणे-भिवंडी या आठपदरी बायपास रस्त्याच्या एक हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली. महिन्यात निविदा व तीन महिन्यांच्या आत हे काम सुरू करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले.परिवहन भवन येथे गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते व परिवहनविषयक कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर श्री. गडकरी यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. बैठकीस महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, राज्यातील खासदार संजय धोत्रे, धनंजय महाडिक, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, राजीव सातव आणि केंद्रीय रस्तेवाहतूक विभागाचे सचिव युधवीरसिंह मलिक तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील रस्त्यांच्या ३० हजार कोटींच्या कामांचा आढावा घेण्यात आला. मुख्यत्वे सातारा-कागल (कोल्हापूर) हा चौपदरी रस्ता सहापदरी करण्यात येणार असून, या संदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात तांत्रिक बाबींमध्ये असलेली विसंगती दूर करण्यात आली. या रस्त्याच्या बांधकामासाठी तीन हजार कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. येत्या एक महिन्यात यासंदर्भात निविदा काढण्यात येतील आणि तीन महिन्यांत कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.----- बास्केट ब्रीजचे काम सुरु करा : महाडिकया बैठकीत कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बास्केट ब्रीजची बांधणी तातडीने सुरु करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. नागपूर-रत्नागिरी महामार्ग कोल्हापूर शहरातून प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येईल. त्यासाठी शिरोली नाका ते शिवाजी पुल या मार्गावर नवीन उड्डाण पूल उभारण्यात यावा असेही महाडिक यांनी सुचविले.सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामांसाठी तीन हजार कोटीं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:39 AM