सातारा : गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून, तब्बल तीन हजार पोलिसांचागणेशोत्सवावर वॉच राहणार आहे. साताऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौका-चौकात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. शहरात येणारी आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये मोळाचा ओढा, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप, बोगदा परिसरातील ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय मुख्य चौकातही पोलीस आणि होमगार्ड तैनात आहेत. साध्या वेशातील पोलीस आणि निर्भया पथकही गस्त घालत आहे.पुण्याहून एसआरपीचे दोन प्लाटून साताऱ्यात दाखल झाले आहेत. एका प्लाटूनमध्ये २२ कर्मचारी असतात. जिल्हा पोलीस दलातील १७५६ कर्मचारी, ५५ इतर अधिकारी, पोलीस निरीक्षक १२, उपविभागीय पोलीस अधिकारी ५, आरसीपी प्लाटून तीन तुकड्या (एका तुकडीमध्ये १२ जण), स्ट्रायकिंग फोर्सच्या तीन तुकड्या (एका तुकडीमध्ये २० जण) या शिवाय ९७४ होमर्गाडही गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवावर तीन हजार पोलिसांचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 10:40 AM
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून, तब्बल तीन हजार पोलिसांचा गणेशोत्सवावर वॉच राहणार आहे. साताऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठळक मुद्देगणेशोत्सवावर तीन हजार पोलिसांचा वॉचकडेकोट बंदोबस्त : पुण्याहून एसआरपीचे दोन प्लाटून दाखल