पुसेसावळी : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान सन्मान किसान योजना अंमलात आणली असून, यातून शेतक-यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत; पण ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये अपुºया सोयीसुविधा व कर्मचाºयांकडून होत असलेली टाळाटाळ यामुळे आजही हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
केंद्र शासनाकडून शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना निर्माण केली; पण गेल्या कित्येक महिन्यापासून या योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा होत नाहीत. यास प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.
यापूर्वी शेतक-यांनी गावामध्ये असणा-या अधिक-यांकडे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा केली होती. मात्र, ही कागदपत्रे संगणकावर भरताना संबंधित संगणक चालकाकडून अनेक शेतक-यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक तसेच बँकांची नावे चुकविलीही आहेत.
त्यामुळे आज अनेक शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात नेमलेल्या संगणक चालकांकडूनही शेतकरी वर्गाला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. तसेच संगणकावर खाते क्रमांक बदलण्याची सोय नसल्यामुळे शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे.
शेतक-यांच्या विकासासाठी असलेल्या या सन्मान योजनेचा अनेक शेतक-यांना लाभ मिळत नाही, त्यामुळे ही योजना म्हणजे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखीच झाली आहे. त्यामुळे संबंधित महसूल व ग्रामपंचायत विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.
- शासकीय कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात शेतकºयांच्या या सन्मान योजनेतील शासकीय कर्मचा-याकडून नजरचुकीने झालेल्या चुका सुधारण्यासाठी खासगी ग्राहक सेवा केंद्रात किंवा आॅनलाईन कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन ५० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
- अनेक शेतक-यांची बँक खाते नंबर चुकीचे सेव्ह झालेले आहेत. तरी या शेतकºयांचे चुकलेले खाते नंबर दुरुस्त झाल्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे आॅनलाईन पोर्टलमध्ये खाते नंबर दुरुस्त करण्यासंबंधीचे अपडेट करणे गरजेचे आहे.
-प्रशांत पिसाळ,सामाजिक कार्यकर्ते.