जीवन ऊर्फ प्राण नामदेव कांबळे (वय २८, रा. कालगाव, ता. कऱ्हाड), ऋषिकेश अविनाश सावंत (वय २०, रा. बुधवार पेठ, कऱ्हाड) व अविनाश आनंदा माने (वय २४, रा. कालगाव, ता. कऱ्हाड), अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह पथक गुरुवारी, दि. १३ उंब्रज परिसरात गस्त घालत असताना त्याठिकाणी दुचाकी चोरांची टोळी वावरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या टोळीतील तिघांना अटक केली. त्यांच्याकडे तपास केला असता १० मे रोजी कोपर्डे हवेलीतून एक दुचाकी चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्या कालावधीत पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल तपास केला. त्यावेळी त्यांनी कोपर्डे हवेलीतून एक, तसेच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच, कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक, तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक, नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक, अशा नऊ दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यापैकी सात दुचाकी व एका दुचाकीचे इंजिन पोलिसांनी हस्तगत केले.
या टोळीने आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुषंगाने तपास केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे आदींनी ही कारवाई केली.
फोटो : १६केआरडी०२
कॅप्शन : सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत.