शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

कºहाडी माणुसकीनं प्रवाशांचा घसा ओलावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:53 PM

संतोष गुरव ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पाण्याचं महत्त्व हे सर्वज्ञात आहे. घरात कोणी पै-पाहुणा किंवा अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला प्रथम पाण्याने भरलेला तांब्या देण्यासाठी प्रत्येकाचे हात पुढे येतात. कºहाड शहरातही अशीच आपुलकीची सामाजिक बांधिलकी कºहाडकरांकडून जपली जातेय.घरात येणाऱ्या पाहुण्याप्रमाणे शहरात येणाºया प्रवाशांसाठीही. शहरात येणाºया प्रवाशांना थंडगार पाणी पिता यावं म्हणून ...

संतोष गुरव ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पाण्याचं महत्त्व हे सर्वज्ञात आहे. घरात कोणी पै-पाहुणा किंवा अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला प्रथम पाण्याने भरलेला तांब्या देण्यासाठी प्रत्येकाचे हात पुढे येतात. कºहाड शहरातही अशीच आपुलकीची सामाजिक बांधिलकी कºहाडकरांकडून जपली जातेय.घरात येणाऱ्या पाहुण्याप्रमाणे शहरात येणाºया प्रवाशांसाठीही. शहरात येणाºया प्रवाशांना थंडगार पाणी पिता यावं म्हणून ठिकठिकाणी थंडगार पाण्याचे माठ तर कुठे पाणपोया ठेवण्यात आल्या आहेत, हे उत्तम उदाहरण आहे.सध्या चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम केले जात आहे. त्यामुळे सतत पाणीपुरवठा बंद तर वीज पुरवठा खंडित होत आहे. त्याचा नाहक त्रास कºहाडकरांना सहन करावा लागत आहे. आपल्याप्रमाणे शहरात येणाºया प्रवाशांना याचा त्रास होतच असेल असा विचार करीत येथील काही सामाजिक संघटना, रिक्षा संघटना व नागरिकांच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून शहरात थंडगार पाण्याची सोयकरण्यात आली आहे. कुणी थंडगार पाण्याचे मातीचे माठ ठेवत आहे. तर कुणी वॉटर फिल्टर ठेवलेले आहेत. या सामाजिक बांधिलकीस बँका, पतंसंस्था तसेच काही संस्थांनीही हातभार लावला आहे. घोटभर पाण्याअभावी कोरड्या पडलेल्या घशाला आता कºहाडकरांकडून ‘गारवा’ दिला जात आहे. वाढलेल्या उष्मामुळे दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. शहरात येणाºया बाहेरगावच्या प्रवाशांना थंडगार पाण्याची सोय करण्यात आली आहे.इथं आहेत थंडगार पाणपोई...१. बसस्थानक परिसर : शिवशक्ती अ‍ॅटो रिक्षा संघटनेची पाणपोई२. नवग्रह मंदिर परिसर : अजंठा अ‍ॅटो रिक्षा युनियनचे मातीचे माठ३. कार्वे नाका येथे नंदी चौक : जनावरांसाठीची दगडी कुंड४. पाटण कॉलनी : शिवाजी गणेश क्रीडा मंडळाची पाणपोई५. बुधवार पेठ येथे डॉ. आंबेडकर चौक : पाणपोई६. मंगळवार पेठ येथे पाणपोई७. पावसकर गल्ली श्रीकृष्ण गजानन मंडळाची पाणपोई८. विश्रामगृह मार्गावर छत्रपती शाहू चौकात असलेली पाणपोई व माठ९. पाटणकर कॉलनी मार्ग : थंडगार पाण्याचे फिल्टर१०. नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालय : जनावरांसाठी पाण्याचे कुंड११. गणपती मंदिर, सोमवार पेठे मार्ग : थंडगार पाण्याचे फिल्टर१२. प्रीतिसंगम बागेत प्रवेशद्वार : थंडगार पाण्याचे फिल्टर१३. मुळीक चौक : थंडगार माठया शासकीय कार्यालयात आहेत पाणपोईशहरातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात थंडगार पाण्याचे कूलर ठेवण्यात आलेले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय, पालिका, पंचायत समिती, शिवाजी क्रीडा संकुल येथे थंडगार पाणपोया आहेत.‘गाढवांसाठींची पाणपोई’ झाली बंदमाणसांप्रमाणे जनावरांना देखील तहान लागत असते. शहरातील पोलीस भवन शेजारी जयसिंगराव करपे धर्मशाळेच्या वतीने ‘गाढवांसाठी पाणपोई’ वर्षानुवर्षे सुरू होती. मात्र, ती काळाच्या ओघात बंद पडली. या ठिकाणी शहरातील गाढवे, पाळीव प्राणी पाणी पिण्यासाठी येत असत.