शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

मराठा मोर्चाचं नेतृत्व करणार साताºयाची गादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सकल मराठा समाजातर्फे क्रांतिदिनी (दि. ९ आॅगस्ट) मुंबई येथे काढण्यात येणाºया मोर्चाचे नेतृत्व साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे. आगामी काळात छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या दोन गाद्यांचे वंशज यानिमित्ताने आक्रमकपणे वाटचाल करताना दिसणार आहेत.मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सकल मराठा समाजातर्फे क्रांतिदिनी (दि. ९ आॅगस्ट) मुंबई येथे काढण्यात येणाºया मोर्चाचे नेतृत्व साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे. आगामी काळात छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या दोन गाद्यांचे वंशज यानिमित्ताने आक्रमकपणे वाटचाल करताना दिसणार आहेत.मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत २१० सदस्य असणार आहेत. या समितीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे यांच्याकडे सूत्रे राहतील, अशी माहिती समन्वय समितीचे संयोजक करण गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.सकल मराठा समाजाने मुंबईमध्ये मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणानंतर विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळाला. लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा क्रांतिदिनी थेट मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.साहजिकच सर्व जिल्ह्यांमध्ये काढलेल्या मोर्चात सहभागी झालेले लाखो मराठा बांधव एकत्रितपणे मुंबईत धडकणार असल्याने मुंबईत चक्काजाम करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील निवडक सदस्यांचा समावेश करुन २१० सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांची बाजू दस्तुरखुद्द कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सावरण्याचा प्रयत्न केला होता. उदयनराजेंच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यभरातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. उदयनराजेंच्या नेतृत्वाची व्याप्ती यानिमित्ताने पुढे आली. त्याला संभाजीराजेंचीही साथ मिळत आहे. आता राजकीय क्षेत्रातही हे दोघे राजे संयुक्तिकपणे मोहिमा काढताना पाहायला मिळू शकतील.दोन्ही राजेंना घेतलेय सोबत...सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना सोबत घेऊन आपल्या धोरणांना ऐतिहासिक स्वरुप प्राप्त करुन दिले आहे.कोल्हापूर व सातारा या दोन्ही गाद्या या निमित्ताने पुन्हा चर्चेमध्ये आल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले हे लोकनियुक्त तर खासदार संभाजीराजे हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत. खासदार उदयनराजे भोसले व खासदार संभाजीराजे या दोघांनाही यानिमित्ताने सोबत घेतले आहे.