पाटण : पाटण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे चित्र गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले असून, त्यापैकी ३२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. १५ ग्रामपंचायतींच्या अंशत: निवडणुका होणार असून, आता एकूण ६३ ग्रामपंचायतींमध्ये गावागावात काँटे की टक्कर होणार आहे. बिनविरोध झालेल्या ३२ ग्रामपंचायतींसाठी देसाई-पाटणकर गटामध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले असून, आमदार शंभूराज देसाई व माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदारांनी कौल फिरविल्यामुळे आजपर्यंत गावागावांत लहान-मोठे राजकीय बदल झाले. या दरम्यान कोण चार्ज झाले तर कोणी मुड नसल्यासारखे दाखवू लागले आहेत. तालुक्याच्या नेत्यांची लढाई संपली. आता ग्रामपंचायती निवडणुकांमुळे गावागावांत राजकीय आखाडा सुरू झाला. यामध्ये कोण जोमात, तर कोणी कोमात असल्यासारखे निवडणुकीत उतरले आहेत. त्यातच पावसाळ्याचे दिवस, शेतीच्या कामांची हातघाई सुरू आहे. मात्र, नेते सांगतात म्हणून गावात पॅनेल टाकायचे या मानसिकतेतून काहीजण रिंगणात उतरले आहेत. तर नसल्या उचापती नकोत म्हणून शहाण्या, जाणत्या कार्यकर्त्यांनी गावातील निवडणुका बिनविरोध करून टाकल्या. आता उर्वरित ६३ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतींमध्ये एक दोन वॉर्डमध्येच निवडणुका होतील. (प्रतिनिधी)वीस ग्रामपंचायतींवर देसाई गटाचा झेंडा!पाटण : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायती नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी २० ग्रामपंचातींवर देसाई गटाचे वर्चस्व असल्याचा दावा देसाई गटाने केला आहे.पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असून, त्यापैकी ३२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर १५ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी २० ग्रामपंचायतींने आमदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मान्य करून निवडणूक बिनविरोध केली आहे. यामध्ये पुसाळे, पाठवडे, सळवे, कसणी, निगडे, सातर, उमरकांचन, सुपूगडेवाडी, चव्हाणवाडी (धामणी), मानेवाडी, खोणोली, चव्हाणवाडी (नाणेगाव), कवरवाडी, नाणेल, माटोली धावडे, तामिणे माडदेव, नेरळे, बाचोली अशा २० ग्रामपंचायती देसाई गटाची बिनविरोध सत्ता आली आहे. दरम्यान, बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे व ग्रामस्थांचे, कार्यकर्त्यांचे आमदार शंभूराज देसार्इंनी कौतुक केले आहे. कातवडी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून, यासाठी पितापुत्रांमध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला असून, वडील देसाई गटाकडून तर मुलगा पाटणकर गटाकडून एकाच वाडीमधून निवडणूक लढवित असल्यामुळे या ठिकाणी लक्षवेधी निवडणूक होत आहे. कुडाळला चौरंगी; बामणोलीत तिरंगीजावळी तालुका : ५६ पैकी ३३ ग्रामपंचायती बिनविरोध औंध गटात धुमशानग्रामपंचायत निवडणूक : पळशी ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्षमांढरदेव ग्रामपंचायतीत सात उमेदवार बिनविरोधगाठीभेटी वाढल्या : दोन जागांसाठी होणार निवडणूकग्रामपंचायत मतदानादिवशीकामगारांना सुटीजिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेशकुडाळ ग्रामपंचायतीत महिलांचे पॅनेल
६३ ग्रामपंचायतींमध्ये काँटे की टक्कर
By admin | Published: July 26, 2015 9:43 PM