संजय कदम ।वाठार स्टेशन : इतर गावांची सलग तीन वर्षे तहान भागविणाºया जाधववाडी येथील शेतकºयावरच आत्ताच उपासमारीची वेळ आली आहे. विहिरीचे पाणी गावाची तहान भागवण्यासाठी सलग तीन वर्षांपासून शासकीय अधिकाºयांनी दबाबतंत्र वापरून अधिग्रहण केल्याचा आरोप संबंधित अल्पभूधारक शेतकºयाने केला आहे. त्याचे जिल्हा बँकेतील कर्जही थकले आहे.
जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात जाधववाडी येथील बबन महादेव वाघ या शेतकºयाने म्हटले आहे की, तीन वर्षांत गावाला पाणी दिले. परंतु पाण्याचा मोबदलाही शासनाने दिलेला नाही. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जही थकले आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. एक तर शासनाने या पाण्याचा मोबदला द्यावा, अन्यथा जिल्हा बँकेचे कर्ज शासनाने माफ करावे.याबाबत माहिती अशी की, जाधववाडी गावात राहणारे बबन वाघ यांना वडिलार्जित दोन एकर विहीर बागायत शेती आहे. याच शेतीवर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची या शेतीवरील विहीर शासनाने गेल्या तीन वर्षांपासून अधिग्रहण केली आहे.
त्यामुळे त्यांच्या शेतीत कोणतीच पीक निघत नाही. त्यातून ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तर शासनानेही या पाण्याचा कोणताही मोबदला त्यांना दिला नसल्याने त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेतलेले दोन लाखांचे कर्जही थकले आहे. एका बाजूला शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन पुढाकार घेत असताना जाधववाडी गावातील शेतकरी शासनाच्या कारभाराला वैतागून आत्महत्या करण्याच्या भूमिकेत आहेत. एक तर शासनाने तत्काळ तीन वर्षांचा मोबदला द्यावा, अन्यथा बँकेतील कर्ज तरी माफ करावे, अशी मागणी जाधववाडी ग्रामस्थ करत आहेत.
जाधववाडी येथील संबंधित शेतकºयाचा प्रस्ताव मला मिळाला असून, हा प्रस्ताव कोरेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठविला आहे. तो प्रस्ताव मिळताच संबंधित शेतकºयाला त्याच्या हक्काचे पैसे पैसे मिळतील.- स्मिता पवार, तहसीलदार, कोरेगावगावात इतर लोकांच्या विहिरी असतानाही सलग तीन वर्षांपासून आकासापोटी माझीच विहीर अधिग्रहण करण्यासाठी गावचे ग्रामसेवक, तलाठी व तहसीलदार मला दमदाटी करत आहे.- बबन वाघ,शेतकरी, जाधववाडी.