ठळक मुद्देमतदानावेळी गाडीवर पक्षाचे चिन्हआचारसंहिता भंग केल्याचा एकावर गुन्हा
सातारा : मतदानाला सकाळी सुरुवात झाल्यानंतर गाडीवर पक्षाचे चिन्ह लावून फिरणाऱ्या एका व्यक्तीवर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.विक्रम शांताराम पवार (रा. गोळीबार मैदान, गोडोली सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. विक्रम पवार यांच्या गाडीवर भाजपचे तालुका अध्यक्ष आणि कमळ हे चिन्ह असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी पवार यांना अडविले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला.