वाई : धोम डाव्या कालव्यात मोटार सायकल घसरून पडल्याने पांडेवाडी येथील सनी राम काळे याचा मृत्यू झाला. अंगावर असलेल्या जाकीटची चेन दगडात अडकल्यामुळे सनीला पाण्यात कसलीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पसरणी, ता. वाई येथील यात्रेत जेवणासाठी बंटी काळे व सनी राम काळे (वय २५, रा. पांडेवाडी) हे दोघे मित्र मोटारसायकल (क्र. एमएच ०२ बीके ५४५१) वरून गेले. पांडेवाडी येथून पसरणीला आल्यानंतर जेवण उरकून रात्री उशिरा एकच्या दरम्यान ते पुन्हा पांडेवाडी या आपल्या गावी जात असताना पसरणीजवळ कालव्यावरील पुलावर अचानक वळण आहे. कालव्याच्या वळण पुलावर मोटारसायकल आली तेव्हा अंधारामुळे या रस्त्यावर असलेली खडी त्यांना दिसली नाही. या जागेवर येताच तिथे रस्त्यावरील खडीवरून मोटारसायकल घसरून खाली पडली. यावेळी पाठीमागे बसलेला सनी राम काळे हा कालव्यातील पाण्यात पडला. सनी पडल्यानंतर बंटीने मोबाईल लाईटच्य प्रकाशात त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या अंधारात बराच वेळ शोधाशोध केली मात्र सनी सापडला नाही. त्यानंतर त्याने त्याचे नातेवाईक आणि मित्रांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. याबाबत हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी ७.४५ वाजता कॅनॉलमध्ये काही अंतरावरच सनीचा मृतदेह काहींना आढळून आला. सनी काळेच्या अंगातील जॅकेट दगडात अडकल्याने त्याला हालचाल करता आली नाही आणि कॅनॉलच्या तळाशी त्याचा मृतदेह सापडला. पुढील तपास पो.ह. सी. आर. पाटील करत आहेत. (प्रतिनिधी)
अंगावरचे जाकीट बुडत्याला काळ
By admin | Published: February 13, 2015 12:05 AM