शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

आजचं भागलं, पण उद्याचं काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:41 AM

प्रमोद सुकरे कराड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे प्राणवायू ऑक्सिजनचे महत्व चांगलेच लक्षात आले आहे. कोरोना बाधितांची संख्या मोठी असल्याने ...

प्रमोद सुकरे

कराड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे प्राणवायू ऑक्सिजनचे महत्व चांगलेच लक्षात आले आहे. कोरोना बाधितांची संख्या मोठी असल्याने ऑक्सिजनची मागणी सुमारे चार पट वाढली आहे. परिणामी मागणी तसा पुरवठा होत नसल्याने ऑक्सिजनच्या बाबतीत ''आजचं भागलं पण उद्याचं काय'' असा प्रश्न रुग्णालयांसमोर उभा आहे.

कराड शहर व तालुक्यात कोरोना बाधितांवर उपचार करणारी छोटी-मोठी अकरा हॉस्पिटल आहेत. पैकी कृष्णा हॉस्पिटल व सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडे स्वतःचे मोठे ऑक्सिजन टँक आहेत. मात्र उर्वरित हॉस्पिटल हे विक्रेत्यांकडून सिलिंडर मधून ऑक्सिजन विकत घेत असतात. कोरोना संकट नसताना या हॉस्पिटलला कमी प्रमाणात ऑक्सिजन लागत होता. पण सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रुग्णालयांची मागणी चार पटीने वाढली आहे. त्याची पूर्तता होणे अवघड बनले आहे.

कराड येथे लिक्विड ऑक्सिजन सिलिंडरमधून भरून देणारा छोटा प्लांट आहे . तेथे दर एका तासाला साधारणत: चाळीस सिलिंडर भरण्याची क्षमता आहे. कराडला ४५० सिलिंडर पुरवायचे म्हटले तर दहा ते अकरा तास सतत काम करून ते पुरवठा करु शकतात. पण त्यासाठी पुरेसा लिक्विड ऑक्सिजन मिळणे गरजेचे आहे. गुरुवारी या विक्रेत्याकडे ४ टन ऑक्सिजन आल्याचे खात्रीशीर समजते. त्यातून सुमारे ४०० सिलिंडर तयार होतील ते रुग्णालयांना पुरविले जातील. तरीदेखील पन्नास सिलिंडर कमीच पडतील .कसे तरी आजचे भागेल पण उद्याचं काय? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

दरम्यान कोरोना झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. ऑक्सिजनच्या टंचाईमुळे नातेवाईकांची धडधड वाढली आहे. प्रशासन पुरेसा ऑक्सिजन साठा असल्याचे सांगून धीर देण्याचा प्रयत्न करीत आहे .पण प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल चालकांची खरी कसरत सुरू आहे. '' सहन होईना अन सांगता येईना '' अशी त्यांची अवस्था झाली आहे. पण ऑक्सिजन टंचाई बाबत रुग्णांच्या नातेवाईकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

चौकट

''ऑयनॉक्स'' ने पुरवठा बंद केलाय ...

गत दहा वर्षापूर्वी पासून कराड सातारला प्रामुख्याने ऑयनॉक्स ही कंपनी ऑक्सिजन पुरवठा करीत आली आहे .तो पुरवठा थेट रुग्णालय किंवा विक्रेते यांच्याकडे होत होता. कोरोनाच्या गतवेळच्या लाटेतही या कंपनीने ऑक्सिजन कमी पडू दिला नाही. पण सध्या या कंपनीने सातारा, सांगली, कोल्हापूरला ऑक्सिजन पुरवणे अचानक बंद केले आहे. हा पुरवठा न करण्याच्या अलिखित सूचना संबंधित कंपनीला कोणी केल्या आहेत. याचा शोध घेण्याची गरज विक्रेतेच व्यक्त करीत आहेत.

चौकट

कसे तयार होतात ऑक्सिजन सिलिंडर ...

एक टन लिक्विड ऑक्सिजन म्हणजे १००० किलो असतो. त्यापासून ७७७ क्युबिक ऑक्सिजन तयार होतो. एका सिलिंडरमध्ये ७ क्युबिक ऑक्सिजन भरला जातो. म्हणजे साधारणतः एक टन लिक्विड ऑक्सिजन पासून १०० ऑक्सिजन सिलिंडर तयार होतात. कराडला कृष्णा आणि सह्याद्री हॉस्पिटल वगळता इतर हॉस्पिटलला दररोज सुमारे ४५० सिलिंडरची गरज असल्याचे डॉक्टर सांगतात .

चौकट

अत्यवस्थ रुग्णांना घेणेच केलेय बंद ...

कराडमध्ये गेल्या दोन दिवसापासून हाॅस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. ऑक्सिजन वेळेत व पुरेसा मिळाला नाही तर रुग्णांचे काय करायचे ही भीती रुग्णालयांसमोर आहे. त्यामुळे शहरातील काही कोविड हॉस्पिटलनी अत्यवस्थ रुग्णांना प्रवेश देणेच बंद केले आहे. थोडक्यात टाळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे .

चौकट

ऑक्सिजन जनरेट प्लांटचा पर्याय ..

आज बहुतांशी हॉस्पिटलला ऑक्सिजन साठी परावलंबी राहावे लागत आहे. लिक्विड ऑक्सिजन त्याला विकत घ्यावा लागतो. फरक एवढाच आहे की काहीजण ते मोठ्या प्रमाणात घेतात व त्याचा टँकमध्ये साठा ठेवतात तर छोटी हॉस्पिटल तोच सिलिंडरमधून विकत घेतात. पण आता ऑक्सिजन जनरेट प्लांट स्वतः उभा करण्याबाबत हॉस्पिटल व आरोग्य विभागाने विचार करायला हवा.

कोट

सध्या ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्या प्रमाणात पुरवठा होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आम्हालाही इतर वेळी ऑक्सिजन कमी प्रमाणातच लागायचा पण ,कोरोना बाधित रुग्ण जास्त असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जास्त ऑक्सिजनची गरज आहे. तो वेळेत मिळत नसल्याने तणावपूर्ण वातावरणात काम करावे लागत आहे.

रोहिणी एरम

संचालिका

शारदा क्लिनिक कराड