शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

आज थंडावणार प्रचाराच्या तोफा

By admin | Published: June 18, 2015 10:13 PM

अखेरच्या टप्प्यात भडकतंय पत्रकयुद्ध

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २१ जून रोजी होत आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप- प्रत्यारोपांचा गदारोळ पाहायला मिळाला असून शुक्रवार, दि. १९ रोजी या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत; पण अखेरच्या टप्प्यात पत्रक युद्धही चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. ‘कृष्णे’च्या निवडणुकीत यंदा प्रथमच तिरंगी लढत होत आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल, मदनराव मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल तर डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल यांच्यातही लढत होत आहे. स्थानिक नेत्यांपासून राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंत सर्वजण या प्रचारात उतरल्याने प्रचाराचा धुरळा उडाला आहे. झेंडे, टोप्या, कापडी फलक, फ्लेक्सबोर्ड, एलईडी स्क्रीन अन् सोशल मीडिया आदी माध्यमांचा वापर प्रचारात मोठ्या प्रमाणात झाल्याने विधानसभा निवडणुकीसारखीच परिस्थिती साऱ्यांना अनुभवायला मिळतेय. गेले महिनाभर कोपरा सभा अन् जाहीर सभा सुरू आहेत. या सभांमधून आराप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तिन्ही पॅनेलकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे. कारखान्याच्या निवडणुकीतील विजय हा या नेत्यांना नजीकच्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत होणार असल्याने या उमेदवारांनी गुलाल मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना तिन्ही पॅनेलने प्रचार पत्रकांवर भर दिला आहे. पॅनेलचा जाहीरनामा तर यापूर्वीच प्रसिद्ध झालाय; पण व्यासपीठावर जे बोलून झालंय अन् जे बोलायचं राहून गेलंय त्याची गोळाबेरीज करून काही भडक पत्रके शेवटच्या टप्प्यात काढल्याने सभासदांचीच ‘मती’ गुंग होण्याची वेळ आली आहे.प्रेमात अन् युद्धात सारं काही माफ ! खरंतर निवडणूक सहकारी साखर कारखान्याची आहे. त्यामुळे प्रचारात कारखान्याच्या कारभारावरच जास्त चर्चा व्हायला पाहिजे; पण या प्रचार सभांमधून कारखान्यावर कमी अन् व्यक्तिगत पातळीवरच आरोप-प्रत्यारोप जास्त प्रमाणात ऐकायला मिळाले. तरीही प्रत्येकजण आम्ही फक्त कारखान्याबाबतच बोलत असतो. विरोधकच वैयक्तिक पातळीवर टीका करतात, असे सांगून मोकळे होताना दिसले. तर काहीना प्रेमात अन् युद्धात सारं काही माफ असतं, असं सांगून टाकलं; पण व्यक्तिगत पातळीवरचे हे आरोप सुज्ञ सभासदांना किती पचनी पडणार, हा संशोधनाचा भाग आहे. सभासदांना दररोजच्या प्रीतिभोजनाचं निमंत्रण ! निवडणूक आली की, हौसे, नवसे, गवसे यांची गर्दी असतेच. उमेदवारांना या साऱ्यांना सांभाळावे लागते. उमेदवारांकडून दररोजच प्रीतिभोजनाचं निमंत्रण दिलं जात असून, कार्यकर्त्यांचीही आपसूक सोय होत आहे.